HSC Exam Result Date: सस्पेन्स संपला! बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, कसा पाहायचा रिजल्ट?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
HSC Board Exam Result 2025 Date: बारावीचा निकाल कधी लागणार याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तारीखेची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून बारावीचा निकाल कधी लागणार याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुरुवातीला बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल, असं सांगण्यात येत होतं. त्यानंतर हा निकाल १५ तारखेचा आत लागेल, असं सांगण्यात येत होतं. मात्र आता थेट निकालाची तारीखच समोर आली आहे.
बारावीचा निकाल कधी जाहीर होणार
उद्या सोमवारी ५ मेला बारावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. उद्या सकाळी बोर्डाकडून बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
advertisement
विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं होणार?
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील. ग्रेडिंग सिस्टीमनुसार, ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे. ६० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. ४५ टक्के ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. उत्तीर्ण होण्यासाठी ३५ पेक्षा जास्त गुण हवे. ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुणही मिळू शकणार नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.
advertisement
कुठे पाहता येणार निकाल
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
निकाल कसा चेक कराल?
-सगळ्यात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
-होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्याला क्लिक करा.
-क्लिक करताच नवीन विंडो ओपन होईल. त्याठिकाणी सीट नंबर आणि इतर माहिती भरुन ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
-त्यानंतर तुमचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
advertisement
-हा निकाल डाऊनलोड करता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 04, 2025 1:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
HSC Exam Result Date: सस्पेन्स संपला! बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, कसा पाहायचा रिजल्ट?