Devendra Fadnavis On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू होऊ नये, मतदार यादी घोटाळ्याच्या आरोपांवर CM फडणवीसांचा टोला
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Devendra Fadnavis On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात वरळीतील मतदार यादीतील घोळाबाबत सादरीकरण केले. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई: मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोपाने राज्याचेही राजकारणही ढवळून निघाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात वरळीतील मतदार यादीतील घोळाबाबत सादरीकरण केले. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे पप्पू होऊ नये अशी अपेक्षा असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील उपशाखाप्रमुखांचा मेळावा सोमवारी पार पडला. त्यावेळी मतदार यादीतील घोळ, संशयास्पद मतदारांबाबत आदित्य ठाकरे यांनी सादरीकरण केले. यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघातील काही मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळाबाबत भाष्य केले.
आज कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयांची माहिती दिली. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांनी राज्याचे पप्पू बनू नये अशी अपेक्षा आहे.
advertisement
राहुल गांधी प्रमाणे त्यांनी स्क्रिन लावून आरोप केले. मात्र, त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. निवडणूक आयोगानेही या आक्षेपांने उत्तर दिली आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी असा प्रकार करू नये असे फडणवीस यांनी म्हटले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 1:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू होऊ नये, मतदार यादी घोटाळ्याच्या आरोपांवर CM फडणवीसांचा टोला

