'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना निरंतर चालू राहणार,' CM एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Last Updated:

ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' सुरु केली, ज्याअंतर्गत सर्वच महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यातील महिलाभगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंमलात आणली. परंतू कालांतराने या योजनेवर अनेक प्रश्न उपस्थीत केले जात आहेत. ही योजना लवकरच बंद देखील होईल असं देखील बोललं जात आहे. पण यावर मुख्यमंत्र्यांनी आपलं वक्तव्य केलं आहे.
ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा महिलाभगिनींच्या मोठ्या उपस्थितीत बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ शाळेच्या मैदानावर झाला. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि विविध विकासकामांचे लोकार्पण झाले, त्यावेळी ते बोलत होते.
advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महिलाभगिनींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना व्यापकपणे व गतीने राबविण्यात आली. विक्रमी कमी वेळेत पैसे खात्यात येण्याची ही योजना ठरली आहे. शासनाने 33 हजार कोटी रुपये या योजनेसाठी बाजूला काढून ठेवले आहेत. त्यामुळे योजना कधीही बंद पडणार नाही. योजनेत मिळणाऱ्या रकमेमुळे गरीबांना निश्चित मदत होत आहे. यापुढेही बळ मिळाले तर आम्ही ही रक्कम वाढवत जाऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
advertisement
मुख्यमंत्री म्हणाले, ''मुलींना मोफत शिक्षण, लेक लाडकी, लखपती दीदी, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, किसान सन्मान योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा योजनांमुळे महिलांना व कुटुंबांना बळ मिळत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे जाळे निर्माण होत आहे. अधिकाधिक बहिणींना लखपती झाल्याचे बघायचे आहे. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.''
advertisement
बुलढाणा शहरात निर्माण करण्यात आलेले महापुरूषांचे पुतळे व विविध कामे सौंदर्यीकरण व विकासाला चालना देणारी आहेत. महापुरूषांच्या स्मारकामुळे नव्या पिढीला कायम स्फूर्ती मिळत राहील, असेही त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना निरंतर चालू राहणार,' CM एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement