advertisement

Congress : नव्या प्रदेशाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा, दोन बड्या नेत्यांची दांडी, काँग्रेसकडून लगोलग स्पष्टीकरण

Last Updated:

Congress Maharashtra President : नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सू्त्रे हाती घेतली. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला दोन बड्या नेत्यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण आले.

News18
News18
मुंबई: काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज पदग्रहण सोहळा पार पडला. आजच्या या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सू्त्रे हाती घेतली. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला दोन बड्या नेत्यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण आले.
लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची धुळदाण उडाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात काँग्रेसचा नवा कर्णधार कोण, याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी धक्कातंत्राचा वापर करत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड केली.
नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अमित देशमुख अशी नावे चर्चेत होती. यात सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, यातील काहींनी प्रदेशाध्यक्षपदासाठी नकार दिला.
advertisement
हर्षवर्धन सपकाळ यांच्या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि आमदार विश्वजीत कदम हे दोन नेते अनुपस्थित राहिले. या दोघांचीही नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले.

सतेज पाटील, विश्वजीत कदम अनुपस्थित का? काँग्रेसचे स्पष्टीकरण...

सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेसने लगोलग स्पष्टीकरणही दिले आहे. विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांचे बंधू संजय पाटील यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूरात पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. त्यामुळे सतेज पाटील अनुपस्थित आहेत. यासंदर्भात त्यांनी प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना कल्पना दिली असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. तर, आमदार विश्वजीत कदम यांच्या चुलत बंधूंचे निधन झाल्यामुळे ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Congress : नव्या प्रदेशाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा, दोन बड्या नेत्यांची दांडी, काँग्रेसकडून लगोलग स्पष्टीकरण
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement