Cyclone Montha update: मोंथा चक्रीवादळाची तीव्रता वाढली...मुंबईपासून 650 किमीवर डिप्रेशन सक्रीय, कुठे-कुठे धडकणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मोंथा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तीव्र होत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याच्या तयारीत आहे. मेलिसा कॅरिबियनमध्ये कॅटेगरी-५ वादळात रूपांतरित झाले.
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या मोंथा या तीव्र चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली आहे. हे वादळ आज, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी, रात्री उशिरा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर वादळी वारे सुटले आहेत, समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रातील डीप डिप्रेशन आणि मोंथा चक्रीवादळाचा परिणाम यामुळे हवामानात सतत बदल होत आहेत.
कुठे आहे चक्रीवादळ?
सध्याची स्थिती पाहता वाऱ्याचा वेग गेल्या ६ तासांमध्ये 'मोंथा' वादळ १२ किमी प्रतितास या वेगाने उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. सकाळी ११:३० वाजेपर्यंत हे वादळ सध्या बंगालच्या उपसागरात १५.२°N अक्षांश आणि ८२.७°E रेखांशावर होतं. मछलीपट्टणमपासून ते साधारण सुमारे १२० किमी दक्षिण-आग्नेय दिशेला. काकीनाडापासून सुमारे २०० किमी दक्षिण-आग्नेय दिशेला आहे. विशाखापट्टणमपासून साधारण २९० किमी दक्षिण-नैऋत्य दिशेला आहे.
advertisement
मोंथा चक्रीवादळ कुठे धडकणार?
ओडिशापासून हे चक्रीवादळ साधारणपणे ४१० किमी दक्षिण-नैऋत्य दिशेला आहे. वाऱ्याचा वेग सध्या वादळाच्या केंद्राजवळ वाऱ्याचा वेग ९०-१०० किमी प्रतितास आहे, जो ११० किमी प्रतितासपर्यंत वाढू शकतो. 'मोंथा' चक्रीवादळ याच उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत राहील. हे वादळ आज, २८ ऑक्टोबरच्या सायंकाळी/रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकेल असं आताच्या स्थितीवरुन वाटत आहे. हे वादळ मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम यांच्या दरम्यान काकीनाडाजवळ किनारपट्टीला धडकेल.
advertisement
The Severe Cyclonic Storm “Montha” [Pronunciation: Mon-Tha] over westcentral Bay of Bengal moved north-northwestwards with a speed of 12 kmph during past 6 hours and lay centered at 1130 hrs IST of today, the 28th October 2025, over the same region, near latitude 15.2°N &… pic.twitter.com/wt9T331SUX
— India Meteorological Department (@Indiametdept) October 28, 2025
advertisement
अरबी समुद्रात डीप डिप्रेशन
किनारपट्टी ओलांडतानाही 'मोंथा' हे तीव्र चक्रीवादळ म्हणूनच राहील आणि वाऱ्याचा कमाल वेग ९०-१०० किमी प्रतितास कायम राहील. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या तटीय भागांत प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रातही एक 'डिप्रेशन' (Depression) अर्थात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र स्थिर झाले आहे. गेल्या तीन तासांपासून हे क्षेत्र त्याच ठिकाणी असून, पुढील ४८ तासांत ते गुजरातच्या दिशेने उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
मुंबईपासून अंतर पाहता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून हे डिप्रेशन सुमारे ६५० किमी पश्चिम-नैऋत्य दिशेला खोल समुद्रात आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातील हे डिप्रेशन पुढील ४८ तासांत पूर्व मध्य अरबी समुद्रातून उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. या डिप्रेशनमुळे अरबी समुद्राकडील वाऱ्यांची दिशा आणि वेग बदलू शकतो, ज्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. या क्षेत्रावर हवामान विभाग बारीक लक्ष ठेवून आहे.
advertisement
२४ तासात 'मेलिसा'चा विध्वंसक रुप
view commentsकॅरिबियन समुद्रात तयार झालेले मेलिसा हे वादळ आता कॅटेगरी-५ या सर्वात धोकादायक चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. हे वादळ वेगाने पुढे सरकत असल्याने मुसधार पाऊस, जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे मोठी जीवित व वित्तहानी होण्याची भीती आहे. 'मेलिसा' या वादळाच्या तीव्रतेत झालेली वाढ थक्क करणारी आहे. शनिवारी या वादळाचा वेग ताशी ११0 किलोमीटर होता, पण केवळ २४ तासांत त्याची गती तब्बल २२५ किलोमीटर प्रतितास झाली! यामुळे ते सर्वात धोकादायक कॅटेगरी-५ चक्रीवादळ बनले आहे. या तीव्रतेच्या वादळात मोठी आणि मजबूत बांधकामे देखील पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकतात. वादळाचा हा प्रचंड वेग आणि वाढती शक्ती जगाला चिंतेत टाकणारी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 2:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Cyclone Montha update: मोंथा चक्रीवादळाची तीव्रता वाढली...मुंबईपासून 650 किमीवर डिप्रेशन सक्रीय, कुठे-कुठे धडकणार?


