दिपाली पाटील प्रकरणी कलाकेंद्राच्या मालकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले तीन महिन्यापूर्वी नर्तिकेने...

Last Updated:

अरविंद जाधव यांनी दिपालीविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले असून मोठी खळबळ उडाली आहे.

Jamkhed Deepali Patil
Jamkhed Deepali Patil
अहिल्यानगर : जामखेडच्या कला केंद्रात काम करणाऱ्या नृत्यांगना दिपाली पाटील हिने एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपात असणाऱ्या संदीप गायकवाडने लग्नासाठी दबाव टाकल्याने तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आईने केला आहे. मात्र ज्या कला केंद्रात दिपाली काम करत होत्या, त्या कला केंद्राचे मालक अरविंद जाधव यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. दिपाली सध्या कला केंद्रात काम करत नव्हती, तीन महिन्यापूर्वीच तिने कला केंद्र सोडल्याचा खुलासा अरविंद जाधव यांनी केला वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. अरविंद जाधव यांनी दिपालीविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. या प्रकरणी संदीप पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.
भाजपचा संदिप गायकवाड हा दिपाली पाटीलवर लग्नासाठी वारंवार दबाव टाकत होता . संदीप गायकवाड हा स्वतः विवाहित असताना तो दिपालीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे दिपालीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. दिपाली देखील विवाहित होती, मात्र ती तिच्या पतीशी पटत नसल्याने माहेरी दोन मुलांसोबत राहत होती. कल्याण येथे दिपालीची आई ही तिच्या दोन मुलांसोबात राहत होती.घरी कमावणारी व्यक्ती कोणी नसल्याने दिपालीने कला केंद्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement

दिपाली पाटीलने कला केंद्र का सोडलं? 

घुंगरू कला केंद्राचे चालक अरविंद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली पाटील ही अतिशय गरीब कुटुंबातील असून उदरनिर्वाह भागवण्यासाठी कला केंद्रावर काम करत होती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून तिने घुंगरू हे कला केंद्र सोडून दिलं होतं. दिपाली पाटील या मूळच्या कल्याणमधील आहेत त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आमच्या कला केंद्रात आल्या होत्या. मात्र तीन महिन्यापूर्वीच त्यांनी कला केंद्र सोडले होते. सध्या त्या आमच्याकडे नव्हत्या. दिपाली पाटील परिस्थितीने खूप गरीब होत्या.
advertisement

सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी

जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचारात रोहित पवार यांनी भाजपवर टीका करताना नगरपरिषद निवडणुकीत भाजपने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली असल्याचे वारंवार म्हटलं होतं. त्यातच आता त्यांच्याच उमेदवाराच्या पतीने दबाव टाकल्याने एका नर्तिकेना आत्महत्या केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. रोहित पवारांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिपाली पाटील प्रकरणी कलाकेंद्राच्या मालकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले तीन महिन्यापूर्वी नर्तिकेने...
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement