दिव्यांग तरुणाने स्वत:च्या मेहनतीवर उभारले साम्राज्य, व्यवसायातून करतो दमदार कमाई
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
जन्मत:च अपंग असलेल्या सिद्धेश बोरसे या तरुणाने त्याच्या जीवनात अनेक संघर्षाना तोंड दिले. अपंग असून देखील कोणाचाही आधार त्याने घेतला नाही आणि चिकाटीने येणाऱ्या अडथळ्यांसोबत जिद्दीने लढता राहिला. आज सिद्धेशचे नाशिकमध्ये स्वतःच्या मालकीचे कापडाचे दुकान आहे.
जन्मत:च अपंग असलेल्या सिद्धेश बोरसे या तरुणाने त्याच्या जीवनात अनेक संघर्षाना तोंड दिले. अपंग असून देखील कोणाचाही आधार त्याने घेतला नाही आणि चिकाटीने येणाऱ्या अडथळ्यांसोबत जिद्दीने लढता राहिला. आज सिद्धेशचे नाशिकमध्ये स्वतःच्या मालकीचे कापडाचे दुकान आहे. त्याच्या दुकानामध्ये अपंग लोकांसाठी अनेक योजना असतात. परंतु आपण जे काही करू ते स्वतःचा जीवावर करू या विचाराने चालणाऱ्या सिद्धेशने आज अनेक तरुणांसमोर एक आदर्श ठेवला आहे. अनेक लोकांच्या जीवनात काही ना काही संघर्ष हा असतोच. त्याच पद्धतीने नाशिकच्या सिद्धेश बोरसे या तरुणाच्या जीवनात देखील त्याला काही गोष्टींना सामोरे जावे लागले.
सिद्धेश हा जन्मापासून अपंग असल्याने आता पर्यंतच्या जीवनात त्याला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. वयाचा अवघ्या दीड वर्षापासून सिद्धेशवर उपचार सुरू आहेत. अनेक हॉस्पिटल अनेक डॉक्टर बदलले तरी देखील त्याच्या आजारावर काही उपाय निघाला नाही. आता असेच आपले जीवन हे त्याने आणि त्याचा परिवाराने समजून घेतले होते. आपला मुलगा अश्या परिस्थितीत असला तरी तो बाकी गोष्टींमध्ये हुशार आहे. त्याची बुद्धीमत्ता चांगली आहे. हे लक्षात आल्यानंतर वडिलांनी त्याला चांगल्या शाळेत शिकवण्याचा प्रयत्न केला. शाळेत दाखल करताना अनेक अडथडे त्याना झेलावे लागले.काही शाळेत तर सिद्धेश याला नकार भेटला तरी देखील त्याचा वडिलांनी जिद्ध सोडली नाही.या नंतर देखिक प्रयत्न करत राहिले असतात एका शाळेत सिद्धेश याला प्रवेश भेटला.
advertisement
सर्व सामान्य मुलांमध्ये सिद्धेश नाहेमी वेगळा असायचा. अनेक मुलं त्याला चिडवत असे तरी देखिक सिद्धेश हा चिकाटीने अभ्यासात लक्ष देऊन त्याच्या पुढेच असायाच. असे करता करता १० वी उत्तीर्ण होऊन १२ वी मध्ये सिद्धेश ने प्रवेश केला आणि १२ वी देखील चांगल्या गुणांनी पात्र केली. या नंतरचे शिक्षण सिद्धेश याने फार्मसी मध्ये घेतले.कोरोना काळात अनेक ठिकाणी मेडिकल सुरु झाल्याने आपण काही वेगळ करूया या विचाराने त्याने सेतू सेंटर उभे केले ज्या ठिकाणी इतरांचे गव्हर्मेंट साठी लागणारे फॉर्म तो भरत असे. या वेळी वाढलेला जनसंपर्क पाहून सिद्धेशने पुढे श्री मेन्स वेअर या नावाने कपड्याचे दुकान सुरू केले आहे.अनेक संकट समोर आली परंतु हार न मनात सिद्धेश चिकाटीने लढत राहिला आणि आज तो स्वतःच्या पायावर देखील उभा आहे. इतरेच नाही तर महिन्याला ५० हजाराचे उत्पन देखील व्यवसायातून घेत आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
November 05, 2025 8:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिव्यांग तरुणाने स्वत:च्या मेहनतीवर उभारले साम्राज्य, व्यवसायातून करतो दमदार कमाई

