देवेंद्र फडणवीस CM पद सोडणार, केंद्रात मोठी जबाबदारी? 'त्या' चर्चेवर स्वत:च दिलं स्पष्टीकरण
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीसांना केंद्रात बोलवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर फडणवीसांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने अलीकडेच राज्यातील महानगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ च्या आधी घ्याव्यात असे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व पक्ष कामाला लागले असून निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्तरावरील महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आपल्या बाजुने वळवण्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीसांना केंद्रात बोलवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बनवण्याची देखील चर्चा सुरू आहे. खरंतर, सध्या भारतीय जनता पार्टीकडे अध्यक्ष पदासाठी कोणताही चेहरा नाही. जेपी नड्डा यांचा कार्यकाल संपला आहे. ते हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. मात्र भाजप सध्या अध्यक्षपदासाठी फ्रेश चेहऱ्याच्या शोधात आहे.
advertisement
अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाऊन भाजपचे अध्यक्ष बनतील, असं बोललं जातंय. त्यासाठी ते महाराष्ट्राचं सीएम पद सोडणार असल्याची देखील चर्चा आहे. या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर स्वत: फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. आपण राज्यातच काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. शुक्रवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं.
advertisement
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी फडणवीस यांच्या नावाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'या पदाच्या शर्यतीत मी नाही. २०२९ पर्यंत मी राज्यातच काम करावं, अशी पक्षाची इच्छा आहे. मी पुढच्या काही वर्षांसाठीची राज्याच्या विकासाची योजना केंद्राला सादर केली आहे,' असंही त्यांनी स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 1:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
देवेंद्र फडणवीस CM पद सोडणार, केंद्रात मोठी जबाबदारी? 'त्या' चर्चेवर स्वत:च दिलं स्पष्टीकरण