Devendra Fadnavis: 75 वर्षांनंतर गावात धावली एसटी, CM फडणवीसांनीही केला प्रवास
- Published by:Prachi Amale
Last Updated:
गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग व ताडगुडा पुलाचे लोकार्पण तसेच वांगेतुरी-गर्देवाडा-गट्टा-अहेरी बससेवेचा शुभारंभ फडणवीसांच्या हस्ते झाला.
गडचिरोली: गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा याच परिवर्तन करण्याचा प्रयत्न गेली 10 वर्ष करत आहे. माओवाद्यांचा प्रभाव संपवून आम्ही गडचिरोली हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा बनविण्यास सुरुवात केली आहे. आता 75 वर्षांनंतर इथल्या लोकांना एसटी बस पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आजचा दिवस खूप खास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग व ताडगुडा पुलाचे लोकार्पण तसेच वांगेतुरी-गर्देवाडा-गट्टा-अहेरी बससेवेचा शुभारंभ फडणवीसांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेली 25 वर्ष मायनिंग सुरू होते पण त्याला पाठबळ मिळत नव्हते. मी मुख्यमंत्री असताना मला यांनी मदत मागितली. मी मदत केली पण गडचिरोलीचा उपयोग वसाहत म्हणून करता येणार नाही, इथून निघणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया विदर्भात करावी लागेल ही अट ठेवली. पोलिसांनी मदत केली, स्थानिकांचा याला विरोध होता. नक्षल विरोध होता पण आज परिवर्तन झालं. कोनसरीचे भूमिपूजन मी जेव्हा केलं तेव्हा लोक बोलायचे भूमिपूजन अनेक होतात पण प्लांट होऊ शकत नाही, त्याचे मी भूमिपूजन केलं आज त्याच लोकार्पण करतोय
advertisement
फडणवीस म्हणाले, नऊ हजार लोकांना रोजगार मिळतोय,25 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. सर्वाधिक विचार स्थानिकांचा करण्यात आला. गडचिरोलीची जल, जमीन, जंगल, येथील बायो डायव्हर्सिटी याला नख देखील लागू देणार नाही येथील संपूर्ण खाणकाम प्रदूषण मुक्त इलेक्ट्रिक वेहिकलने होत आहे. प्रदूषणमुक्त खाणकाम देशात पहिल्यांदा गडचिरोलीत होत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे आणि परिवर्तनही होत आहे. परिवर्तन होत असताना रोजगार मिळाला पाहिजे तो मिळतोय. स्वास्थ्य, रोजगार, शिक्षण मिळतंय. ऑस्ट्रेलियातील मायनिंग युनिव्हर्सिटी सोबत गोंडवाना विद्यापीठाने करार केला आहे.
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
Jan 01, 2025 5:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis: 75 वर्षांनंतर गावात धावली एसटी, CM फडणवीसांनीही केला प्रवास










