Maharashtra Cabinet : CM फडणवीसांनी तिजोरी उघडली, घर, शेती-मातीसाठी भरीव मदत, पूरग्रस्तांना काय-काय मिळणार?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Govt Announce Packege : आज राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने आपली तिजोरी उघडली असून भरीव मदतीची घोषणा केली आहे.
मुंबई : राज्यात आलेल्या महापुराने शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन उद्धवस्त झाले. राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत असताना दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने आपली तिजोरी उघडली असून भरीव मदतीची घोषणा केली आहे.
advertisement
आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आम्ही पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सरकारने छोटी मोठी मदत करण्यास सुरुवात केली. आम्ही सातत्याने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, याचा विचार करत होतो. आम्ही अनेक बाबींचा विचार केल्यानंतर चार गोष्टींवरील खर्च कपात करू पण शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
advertisement
>> मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
> जेवढं नुकसान झालंय त्याची 100 टक्के नुकसान कोणीच देऊ शकत नाही. शेतकरी जास्तीत जास्त पायावर उभा राहिला पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे.
> 29 जिल्हे आणि 253 तालुके यांना मदत करणार आहोत. 2059 मंडळांमध्ये सरसकट नुकसान ग्राह्य धरलं आहे. आता सरसकट नुकसान ग्राह्य धरणार
advertisement
> नव्याने घर बांधणीस मदत करणार असून प्रधानमंत्री आवास योजनांमधून नव्याने घरं बांधून देणार आहोत.
> अंशत: पडझड झालीय त्यांना देखील मदत करणार आहोत.
> मृत्यू पावलेल्या प्रत्येकी दुधाळ जनावरा मागे 37,500 रुपयांची मदत करणार
> कुक्कुटपालनासाठी प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत
advertisement
> NDRF मदतीचा 3 जनावरांचा नियम काढून टाकण्यात आला असून जेवढी जनावरं दगावली तेवढी भरपाई मिळणार
> खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 3 लाख 50 हजारांची भरीव मदत
> खरडून गेलेल्या शेत जमीन नुकसान भरपाई 47 हजार रुपये देणार
advertisement
> प्रति विहीर 30 हजार रुपये - ग्रामीण भागातील बाधित झालेल्या पायाभूत सुविधांसाठी १५०० कोटी
> ओला दुष्काळ संदर्भात दुष्काळाच्या अनुषंगाने सर्व मदत दिली जाईल, वीजबिल, शालेय शिक्षण शुल्क माफीचे महत्त्वाचे निर्णय
> थेट मदत - 6175 कोटी रुपये थेट मदत
advertisement
> रब्बी पिकासाठी बियाणे अतिरिक्त प्रति हेक्टरी 6175 कोटी
> विमा असलेल्या 45 लाख शेतकऱ्यांना 17 हजार हेक्टरी मदत
> कोरडवाहू शेतकऱ्यांना 35 हजार तर बागायतीला 50 हजार पर्यंत मदत मिळेल
> पीकविमा किमान 5000 कोटी
> राज्य सरकारकडून 31, 628 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 2:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet : CM फडणवीसांनी तिजोरी उघडली, घर, शेती-मातीसाठी भरीव मदत, पूरग्रस्तांना काय-काय मिळणार?