OBC कट ऑफ 485, EWS 450... धनंजय मुंडेंनी आरक्षणाचं गणित मांडलं, मराठा मुलांना विशेष आवाहन

Last Updated:

Dhananjay Munde On EWS Cut Off: नुकत्याच झालेल्या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीची आकडेवारी मुलांसमोर ठेवून धनंजय मुंडे यांनी मराठा तरुणांना विशेष आवाहन केले.

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे
बीड : मंत्रि‍पदापासून दूर झाल्यानंतर काहीसे शांत असलेले धनंजय मुंडे सावरगावच्या दसरा मेळाव्यात मात्र जोरदार फॉर्मात होते. सध्याच्या धगधगत्या आरक्षण प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आरक्षण आकडेवारीकडे दुर्लक्ष करून केवळ खुर्चीसाठी सगळे सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीची आकडेवारी मुलांसमोर ठेवून मराठा तरुणांना विशेष आवाहन केले.
गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा त्यांची लेक पंकजा मुंडे यांनी कोणताही खंड न पडू देता यंदाच्या वर्षीही घेतला. या मेळाव्याला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे, महादेव जानकर, तसेच भाजपचे आमदार उपस्थित होते. या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी संबोधित केले.

धनंजय मुंडेंनी आरक्षणाचं गणित मांडलं

धनंजय मुंडे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आम्हीदेखील प्रयत्न केले आहेत. कोणत्याही आरक्षणासाठी मी लढणारा कार्यकर्ता आहे. काहींना मराठ्यांसाठी ओबीसीमधून आरक्षण हवे आहे. पण केवळ स्वत:च्या फायद्यासाठी सगळे सुरू आहे. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. या निकालामध्ये ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ हा 485 गुणांचा होता. तर, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचा (EWS) कट ऑफ 450 गुणांचा होता. जर मराठा समाजातील उमेदवाराने EWS मधून परीक्षा दिली असती तर 450 गुणांवर उत्तीर्ण झाले असते. आता मात्र, ओबीसींचे आरक्षण घेऊन संधी मिळाली नाही हे वास्तव आहे. असे असताना हे कोणाला फसवत आहेत? असा सवाल करून मराठा समाजातील मुलांनी या आकडेवारीकडे डोळसपणे पाहायला हवे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.
advertisement

शक्य तेवढं सगळं दिलं, अजूनही देण्याची भूमिका पण आता....

आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाची गुणवत्ता यादी कमी गुणांची असतानाही केवळ ओबीसीतून आरक्षण घेणार हा हट्ट समाजाच्या हितासाठी नाही तर केवळ काही लोकांना खुर्च्या मिळवायच्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नोकरी-शिक्षणासाठी सरकारला जेवढं शक्य होतं तेवढे दिले, अजूनही देत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर आमचं काहीही म्हणणं नाही. पण आता मात्र, ह्याच्या ताटातून काढून त्या ताटात देऊ नये, असे ते म्हणाले.
advertisement

धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांचे कौतुक

गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कोणताही खंड न पडू देता पंकजा यांनी सुरू ठेवल्याने धनंजय मुंडे यांनी त्यांचे कौतुक केले. यंदा पुरामुळे अतिवृष्टीमुळे विघ्न आले पण अशाही परिस्थितीत साध्या पद्धतीने का होईना पण दसरा मेळावा घेतला, असे धनंजय मुंडे म्हणाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
OBC कट ऑफ 485, EWS 450... धनंजय मुंडेंनी आरक्षणाचं गणित मांडलं, मराठा मुलांना विशेष आवाहन
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement