वाल्मिक कराड ते बीडची बदनामी, शिर्डी अधिवेशनातला धनंजय मुंडे यांच्या भाषणातला शब्द न् शब्द

Last Updated:

Dhananjay Munde Shirdi Adhiweshan: बीडची बदनामी ते वाल्मिक कराड याच्यासोबतचे संबंध आणि त्यातून होत असलेल्या आरोपांना उत्तरे देण्याचा धनंजय मुंडे यांनी शिर्डी अधिवेशनातील भाषणातून प्रयत्न केला.

वाल्मिक कराड-धनंजय मुंडे
वाल्मिक कराड-धनंजय मुंडे
शिर्डी, अहमदनगर : निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरण आणि देशमुख हत्या प्रकरणात नाव आल्यामुळे गोत्यात आलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांसमोर मौन सोडले. बीडची बदनामी ते वाल्मिक कराड याच्यासोबतचे संबंध आणि त्यातून होत असलेल्या आरोपांना उत्तरे देण्याचा धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केला. यावेळी पक्षासाठी घेतलेल्या कष्टाचा आवर्जून उल्लेख करत मंत्रिपद काढले जाऊ नये, यासाठी अप्रत्यक्षपणे बॅटिंगही केली. माझा 'अभिमन्यू' करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही कारण मी अर्जून असल्याचा सांगत एकप्रकारे विरोधक आणि स्वकीयांनाही त्यांनी इशारा दिला.

शिर्डी अधिवेशनातला धनंजय मुंडे यांच्या भाषणातला शब्द न् शब्द

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात शिर्डी येथे सुरू असलेल्या पक्षाच्या नव-संकल्प शिबीर- 2025 या मंथन शिबिरास उपस्थित राहून धनजंय मुंडे यांनी मनमोकळा संवाद साधला.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तुस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत. आज कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा, माझा 'अभिमन्यु' करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यु नाही, मी 'अर्जुन' आहे! आदरणीय अजित दादांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, याचा आनंदच आहे.
advertisement
बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्व. संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे, याची मनात खंत आहे.
advertisement
पक्षात आल्यापासून आजवरच्या वाटचालीत आमचे नेते म्हणून आम्ही आदरणीय दादांच्या पाठीशी उभे राहिलो. अनेक प्रसंगी अजितदादांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. २०१४ - १९ या काळात विरोधी पक्षनेतेपदी काम केले. पक्षाच्या पडत्या काळात चार वेळा हल्लाबोल, परिवर्तन, शिवस्वराज्य आदी यात्रांमध्ये सहभागी होऊन सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. तत्कालीन सरकारला वाकवायचे काम केले.
advertisement
२०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका हे मी सांगितले होते. ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली.
सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी चांगले काम करून दाखवले. गाव - वस्त्यांची जाती वाचक नावे बदलणे, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांसारखे अनेक क्रांतिकारी निर्णय त्याकाळात घेतले.
११ हजार कोटी रुपये पीकविमा एका वर्षात मिळवून देणारा कृषिमंत्री मी, मात्र त्यावरूनही टीका झाली. मात्र अर्धवट माहिती देऊन बदनामी करणारे लोक यावर बोलत नाहीत.
advertisement
लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. त्यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत आदरणीय खा. सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी जाऊ नकोस अन्यथा पुढे विधानसभेत त्याचा तुला त्रास होईल, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. मात्र तरीही मी गेलो. माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीत ठरवून टार्गेट केले गेले. मी माझ्या परळीच्या जनतेच्या आशीर्वादाने एक लाख चाळीस हजार मतांच्या लीडने निवडून आलो, त्याचीच पोटदुखी अनेकांना प्रकर्षाने झाली. ठाण्यात मी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलो म्हणून तिथले नेते बीडमध्ये येऊन मला टार्गेट करत आहे, हेही उघड झाले.
advertisement
विधानसभा निवडणुकीत मी केवळ ५ दिवस पूर्णवेळ परळीत होतो, उर्वरित वेळेत मी पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, बैठका घेतल्या. त्यातील बहुतांश उमेदवार निवडून आले.
मी सतत काम करणारा एक कार्यकर्ता आहे, नेता फक्त नावाला आहे. माझ्यातला कार्यकर्ता कधीच मरणार नाही. मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, पक्ष नेतृत्वाने पाँडिचेरी मध्ये जाऊन पक्ष विस्ताराचे काम कर म्हटले तर तिथे जाऊन मी काम करेल. पक्षाला सुद्धा कार्यकर्ताभिमुख व्हावे लागेल. कार्यकर्त्याला ताकत देताना संपूर्ण विश्वास देखील ठेवणे आवश्यक आहे, तेव्हाच पक्ष संघटना मजबूत होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाल्मिक कराड ते बीडची बदनामी, शिर्डी अधिवेशनातला धनंजय मुंडे यांच्या भाषणातला शब्द न् शब्द
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement