धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का, ओमराजे निंबाळकरांचा विश्वासू नेता भाजपच्या गळाला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू आहे. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे विश्वासू धाराशिव पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. श्याम जाधव यांचा भाजप प्रवेश ओमराजे निंबाळकर आणि पर्यायाने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कट्टर समर्थकांसहित शिवसेनेतील अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास आठ ते दहा महत्त्वाचे पक्षप्रवेश ठाकरे गटातून भाजपमध्ये झाले आहेत. निवडणुकीतील यशानंतरही भाजपकडून ऑपरेशन कमळ सुरूच असून ठाकरे सेनेचे अनेक पदाधिकारी भाजपच्या गळाला लागत आहेत.
धाराशिवची राजकीय समीकरणे बदलणार
श्याम जाधव यांचे धाराशिवमध्ये चांगलेच राजकीय वजन आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
advertisement
श्याम जाधव यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी खूप महत्त्वाचा
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून, ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 6:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का, ओमराजे निंबाळकरांचा विश्वासू नेता भाजपच्या गळाला










