advertisement

Dharashiv Zilla Parishad election: कोण उधळणार गुलाल? धाराशिवमध्ये तिरंगी लढत, अर्चना पाटील मारणार का बाजी?

Last Updated:

धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी  तेर गटात भाजप आमदार राणा राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहे

News18
News18
धाराशीव : नगर परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी  तेर गटात भाजप आमदार राणा राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहे. तर  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय युती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, ठाकरे गटाच्या  कीर्तीमाला खटावकर आणि अर्चना पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
धाराशिव लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तिकीट घेतल्यानंतर अर्चना पाटील यांचा दारुण पराभव खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. त्यानंतर आता अर्चना पाटील या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांनी यावेळी मात्र जिल्हा परिषदेत निवडणूक लढवत आहे.   तेर गटात तिरंगी लढत पाहायला मिळत असून राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युती प्रदेशाध्यक्ष सलगर आणि ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे विश्वासू मुन्ना खटावकर यांच्या पत्नी कीर्तीमाला खटावकर यांच्यात ही लढत पाहायला मिळणार आहे. वरतून ही तिरंगी जरी लढत वाटत असली तरी इथं प्रतिष्ठा भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची लागली आहे.
advertisement
वाढीव मताचा फटका कुणाला बसणार?
तेरमध्ये यंदा 70 टक्के एवढे मतदान झाल्यानं गेल्या वेळेस पेक्षा मताचा टाका थोडा वाढल्याने याचा फटका कोणाला बसेल याची उत्सुकता लागली आहे. अर्चना पाटील या जिल्हा परिषद निवडणूक लढवत असल्या तरी त्या जिल्हा परिषदेची जागा ओपन महिलांना आरक्षित असल्याने त्या अध्यक्षपदाच्या दावेदार म्हणून देखील रिंगणात उभा असून त्यांचा प्रचार ही तसाच करण्यात आला आहे, त्यांच्या या दावेदारीवरून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्षाची काही काळ राजकीय तणाव पाहायला मिळाला होता.
advertisement
जिल्हा परिषदेत अध्यक्ष कोण? 
त्यानंतर मी उमेदवारी माघार घेत असल्याचं मल्हार पाटील यांनी सांगितलं होतं त्यानंतर मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत ही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आता या जिल्हा परिषद निवडणुकीकडे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून पाहिलं जातंय. त्यात आता नेमकं या तिन्ही उमेदवारांपैकी कोण बाजी मारत याकडे लक्ष लागला आहे.
advertisement
जिल्हा परिषदेसाठी किती ठिकाणी निवडणूक? 
धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा इथं पंचायत समितीची निवडणूक होत आहे. तर जिल्हा परिषदेसाठी एकूण ५५ जागा आहे. पंचायत समिती गण अर्थात पंचायत समित्यांसााठी ११० जागांसाठी मतमोजणी होणार आहे. धाराशिवमध्ये सर्वाधिका ९६७ उमेदवार निवणुकीच्या रिंगणात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv Zilla Parishad election: कोण उधळणार गुलाल? धाराशिवमध्ये तिरंगी लढत, अर्चना पाटील मारणार का बाजी?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement