Dharashiv News : पदवीचे शिक्षण घेतले, नोकरी मिळाली नाही, वेल्डिंगच्या दुकानात काम करणारा तरुण बनला यशस्वी व्यावसायिक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
अभिजीत देशमुख यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. मात्र, त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यानंतर त्यांच्या जगण्याचा संघर्ष सुरू झाला. याच परिस्थितीत त्यांनी गावातील वेल्डिंगच्या दुकानात सुरुवातीला तीन ते चार वर्षे काम केले.
धाराशिव : एकेकाळी नोकरी मिळत नसताना वेल्डिंगच्या दुकानात सुरुवातीला काम केले. त्यानंतर स्वतःचा सुरू केला. आज त्या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. धाराशिवमधील अभिजीत देशमुख यांची ही कहाणी आहे. याचबाबत लोकल18 हा विशेष आढावा.
स्वतःचा वेल्डिंगचा व्यवसाय सुरू -
पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अभिजीत देशमुख यांनी वेल्डिंगचा व्यवसाय सुरू केला. यानंतर आता वर्षाकाठी 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. पदवी पर्यंतचे शिक्षण संपल्यानंतर घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी सुरुवातीला दुसऱ्याच्या वेल्डिंगच्या दुकानात कामाला सुरुवात केली. त्याठिकाणी त्यांनी 3 ते 4 वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी आपला वेल्डिंगचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मेहनतीने आणि कष्टाने आता त्यांच्या या व्यवसायाची मोठी भरभराट झाली आहे.
advertisement
वर्षाकाठी 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल -
अभिजीत देशमुख यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. मात्र, त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यानंतर त्यांच्या जगण्याचा संघर्ष सुरू झाला. याच परिस्थितीत त्यांनी गावातील वेल्डिंगच्या दुकानात सुरुवातीला तीन ते चार वर्षे काम केले. याठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचा वेल्डिंगचा व्यवसाय सुरू केला. आपल्या या व्यवसायातून ते आता वर्षाकाठी 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल करत आहे.
advertisement
येलूरच्या शफी भैय्यांची मोफत रिक्षासवारी, 9 वर्षांची अनोखी परंपरा, जिथे हिंदू मुस्लीम एकतेचे होते दर्शन! VIDEO
अभिजीत यांनी आता आपला स्वतःचा व्यवसाय थाटला आहेत. त्यात कुक्कुटपालन शेड, कांदा चाळ, गाय गोठा, गणपतीचे मखर, गौराईचे मखर, शेती अवजारे आदी गोष्टी याठिकाणी बनवल्या जातात. तसेच ऑन कॉल जिथे गरज असेल तिथे जाऊनही ते काम करतात. एकेकाळी नोकरी मिळत नसताना कुठेतरी मजुरी करावी लागली. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तिथे मेहनतीने आणि कष्टाने सातत्याने काम केल्याने आज त्यांचा व्यवसाय यशस्वी झाला आहे. त्यांची ही कहाणी सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
September 11, 2024 7:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv News : पदवीचे शिक्षण घेतले, नोकरी मिळाली नाही, वेल्डिंगच्या दुकानात काम करणारा तरुण बनला यशस्वी व्यावसायिक