मोठी बातमी! तुळजाभवानी मंदिराची बनावट वेबसाईट, अॅप बनवून भाविकांना गंडा; गुन्हा दाखल
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजाभवानी मंदिराची बनावट वेबसाईट आणि अॅप तयार करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
धाराशिव, 16 डिसेंबर, बालाजी निरफळ : धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजाभवानी मंदिराची बनावट वेबसाईट आणि अॅप तयार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक करण्यात आली आहे. अधिकृत अॅप असल्याचं भासवून विविध पुजांच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजय बोदले असं आरोपीचं नाव आहे. दरम्यान या पूर्वी देखील एकदा असाच प्रकार समोर आला होता. आता ही दुसरी घटना समोर आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तुळजाभवानी मंदिराची बोगस वेबसाईट व मोबाईल अॅप तयार करून भाविकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुळजाभवानी मंदीर प्रशानाची कसलीही परवानी न घेता नावाशी साधर्म्य असणारे वेबसाईट व मोबाईल अॅप तयार करण्यात आले. तुळजाभवानी देवीचा फोटो व लोगो वापरुन हे श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानाचं अधिकृत अॅप असल्याचं भाविकांना भासवण्यात आलं.
advertisement
त्या माध्यमातून वेगवेगळ्या पुजांच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळण्यात आले. मंदीर संस्थान आणि भाविकांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी तुळजापूरमधील रहिवासी असलेल्या विजय बोदले याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 417, 419, 420 कलम 66(सी), 66(डी) आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान कोरोना कालावधीत मध्ये देखील तुळजाभवानी मंदिर संस्थानाची बोगस वेबसाईट बनवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता हा दुसरा प्रकार समोर आला आहे.
Location :
Tuljapur,Osmanabad,Maharashtra
First Published :
December 16, 2023 7:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
मोठी बातमी! तुळजाभवानी मंदिराची बनावट वेबसाईट, अॅप बनवून भाविकांना गंडा; गुन्हा दाखल