धाराशिव : आश्रम शाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरण; मित्र, शिक्षकांसह संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
संस्थेतील दोन विद्यार्थी दोन शिक्षक व संस्थाचालकाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे
बालाजी निरफळ, धाराशिव, 6 ऑगस्ट : धाराशिव जिल्ह्यातील वानेवाडी येथील एका आश्रम शाळेतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नारायणराव बाबा रामदेव बाबा वारकरी शिक्षण संस्थेत ही घटना घडली. अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. तसंच विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या पालकांनी मारहाण करून खून झाला असल्याची शंका व्यक्त केली होती. मात्र ही आत्महत्या झाल्याचं समोर आलं असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शिक्षकांसह संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील वानेवाडी इथल्या आध्यात्मिक शिक्षण देणारी संस्था संस्थेत अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला. दहावीत शिकणाऱ्या प्रेम शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून मारहाणीमुळे झालेली हत्या असल्याचा आरोप प्रेम याच्या वडिलांनी केला. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता मात्र पोस्टमार्टनच्या रिपोर्ट नंतर मात्र प्रेम याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झालंय.
advertisement
याप्रकरणी पोलिसांनी याच संस्थेतील दोन विद्यार्थी दोन शिक्षक व संस्थाचालकाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याबाबत संस्था चालकाची ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला आहे. प्रेम शिंदे यांनी गळफास घेऊन केलेली आत्महत्या धक्कादायक आहे. मात्र त्याला त्याचे सहकारी शिक्षक व संस्थाचालक यांनी नेमका कशामुळे त्रास दिला याचा तपास पोलीस करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2023 5:57 PM IST
मराठी बातम्या/धाराशिव/
धाराशिव : आश्रम शाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरण; मित्र, शिक्षकांसह संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल