advertisement

आईसह विवाहित मुलीचा वीजेचा शॉक बसून मृत्यू, जावई अन् दोन मुले थोडक्यात वाचली

Last Updated:

नाशिकच्या ओझरमधील दत्तनगर वसाहतीत घघडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

News18
News18
नाशिक, 06 ऑगस्ट : टेरेसवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या मायलेकींना वीजेचा शॉक बसल्याने दोघींचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. नाशिकच्या ओझरमधील दत्तनगर वसाहतीत घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरावरून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज तारेला स्पर्श झाल्याने घडलेल्या या दुर्घटनेत मीना हनुमंत सोनवणे आणि त्यांची विवाहित मुलगी आकांक्षा राहुल रणशूर यांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आकांक्षा रणशूर ही तिच्या दोन चिमुकल्यांसह पतीसोबत माहेरी आली होती. धोंड्याच्या जेवणासाठी आली असताना कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घराच्या टेरेसवर पेरू तोडण्यासाठी गेले असताना हातातली लोखंडी वस्तू उच्च दाबाच्या वायरला लागली. त्यानंतर वीजेचा जबरदस्त असा शॉक मायलेकींना बसला.
advertisement
मीना सोनवणे आणि आकांक्षा रणशूर यांच्यासोबत तेव्हा पती राहुल रणशूर आणि दोन मुलेही होती. मीना आणि आकांक्षा यांना शॉक बसला तेव्हा पाण्याची टाकी फुटली आणि वीजेचा प्रवाह बंगल्यात उतरला. पती राहूल रणशूर आणि दोन्ही मुले यावेळी बाजूला फेकली गेली त्यामुळे ते वाचले.
घटनेनंतर ओझर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पिंपळगाव इथं पाठवण्यात आले आहेत. मृतदेहांवर सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या प्रकरणाची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/नाशिक/
आईसह विवाहित मुलीचा वीजेचा शॉक बसून मृत्यू, जावई अन् दोन मुले थोडक्यात वाचली
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement