दुष्काळाचा सिताफळ उत्पादनावर परिणाम; खर्चही निघेल की नाही शेतकऱ्यासमोर प्रश्न Video

Last Updated:

दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम थेट सिताफळ शेतीच्या उत्पादनावर झालाय.

+
News18

News18

धाराशिव, 24 नोव्हेंबर : मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे याचा शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळे फळबागा संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे सिताफळाचे उत्पन्न घेणारा शेतकरीही अडचणीत आला आहे. धाराशिव जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम थेट सिताफळ शेतीच्या उत्पादनावर झालाय.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंबी येथील रमाकांत विठ्ठल वाघमारे यांची चार एकर सिताफळाची बाग आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते सिताफळाचे उत्पन्न घेत आहेत. यावर्षी चांगले उत्पन्न होण्याची त्यांना अपेक्षा होती परंतु पाऊस कमी असल्याने यावर्षी कळ्यांची सेटिंग झाली नाही. त्यातच आता सीताफळे तोडणीला आलीयत परंतु बागेला देण्यासाठी पाणी शिल्लक नाही पाण्याअभावी झाडांची पाने पिवळी पडू लागलेत. त्यांना दीड ते पावणे दोन लाख रुपयांचा खर्च आलाय चार ते पाच लाख रुपयांची उत्पन्न होण्याची त्यांना अपेक्षा होती परंतु आता खर्चही निघतो का? असा प्रश्न त्यांना पडलाय.
advertisement
जिल्हा अत्यल्प प्रमाणात पडला पाऊस
सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे पुन्हा पावसाळा सुरू होण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी बाकी आहे. तोपर्यंत दुष्काळाची दाहकता तीव्रपणे जाणू लागलीय. झाडांना पाणी कमी पडल्यामुळे कमी पाण्याचा परिणाम थेट सीताफळांच्या गुणवत्तेवर झालाय. त्यामुळे हलक्या प्रतीचं आणि अत्यंत कमी प्रमाणात सिताफळीचे उत्पादन झालेय. त्यामुळे बाजार भाव कमी कमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने पंचनामा करुन झालेल्या नुकसानीची मदत द्यावी, अशी मागणी यावेळी रमाकांत वाघमारे यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
दुष्काळाचा सिताफळ उत्पादनावर परिणाम; खर्चही निघेल की नाही शेतकऱ्यासमोर प्रश्न Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement