advertisement

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर नागेश यांनी घेतला मोठा निर्णय, 'श्रावण सुरूये म्हणून...'

Last Updated:

Dharashiv Hotel Bhagyashree Owner : पोलीस अधिक्षक रितू खोकर यांना नागेश मडके भेटल्यानंतर आज धाराशिव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात अपहरणकर्त्याविरूद्ध गुन्हा दाखल झालाय.

Dharashiv Hotel Bhagyashree Owner
Dharashiv Hotel Bhagyashree Owner
Hotel Bhagyashree News : धाराशिव 'नादच करती काय? यायलाच लागतंय' या संवादामुळे समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण प्रकरणी अखेर तीन दिवसानंतर धाराशिव शहर पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात डोक्याला बंदूक लावून धमकावत अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाँटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना 23 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता अपहरण करुन मारहाण केली होती. धाराशिव शहर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन गुन्हा दाखल होत नव्हता.

पोलिसांना भलताच संशय

पोलीस अधिक्षक रितू खोकर यांना नागेश मडके भेटल्यानंतर आज धाराशिव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात अपहरणकर्त्याविरूद्ध गुन्हा दाखल झालाय. नागेश मडके हा बंदुकीसाठी बनाव करतोय, असा पोलीसांना संशय होता त्यामुळे गुन्हा दाखल पोलीस करत नव्हते. शेवटी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा आत्मदहनाचा इशारा दिला होता.
advertisement

मटन न देता शुद्ध शाकाहारी जेवण देणार

10 जुलै रोजी नागेश मडके यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिली होती. 13 दिवसानंतर नागेश मडके यांचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली होती धमकी दिल्यावरच पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं होतं असं सांगत मी आता श्रावण महिना असल्याने बोकडाचा नॉनव्हेज मटन न देता शुद्ध शाकाहारी जेवण विकणार असल्याचा निर्णय भाग्यश्री वाल्याने जाहीर केला आहे.
advertisement

40 हजाराची सोन्याची चैन नेली

दरम्यान, मी साधाभोळा अडाणी माणूस, मला बंदुकीची काय गरज, मला तर लिहिता वाचता येत नाही. मला मारहाण झाली. माझी सोन्याची 40 हजाराची चैन नेली. पोलीसांनी गुन्हा दाखल केलाय. चांगला तपास करतील अशी मला खात्री आहे, असे नागेश मडके यांनी म्हटलंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर नागेश यांनी घेतला मोठा निर्णय, 'श्रावण सुरूये म्हणून...'
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement