धाराशिव जिल्ह्यात मागील 28 तासांपासून सतत संततधार; नद्या, ओढे तुडुंब, VIDEO

Last Updated:

दुथडी भरून वाहणारी तेरणा, तितक्यात क्षमतेने वाहणारी मांजरा, काठोकाठ वाहणारी विश्वरूपा, अगदी काठोकाठ भरून वाहणाऱ्या नद्यांमुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, यासोबतच गेल्या 24 तासांपासून धाराशिव जिल्ह्यात सतत संततधार पाऊस होत असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

+
धाराशिव

धाराशिव पाऊस

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाने काल 1 सप्टेंबरला सकाळपासून जोरदार हजेरी लावली. तसेच मागील 28 तासांपासून सतत संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या आणि ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. याचबाबत घेतलेला हा आढावा.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व मुख्य नद्या, दुथडी भरून वाहत आहेत. मांजरा, तेरणा, बानगंगा, विश्वरूपा, अशा अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तरी शेती पिकांचे मात्र नुकसान झाले आहे.
advertisement
दुथडी भरून वाहणारी तेरणा, तितक्यात क्षमतेने वाहणारी मांजरा, काठोकाठ वाहणारी विश्वरूपा, अगदी काठोकाठ भरून वाहणाऱ्या नद्यांमुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, यासोबतच गेल्या 24 तासांपासून धाराशिव जिल्ह्यात सतत संततधार पाऊस होत असल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये काढणीला आलेल्या उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. तर हा पाऊस असाच लागून राहिल्यास काढणीला आलेल्या शेती पिकांचे आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
advertisement
मुंबईतही जोरदार पावसाची शक्यता - 
विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. हवामानशास्त्र विभागानं राज्यात 2 ते 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पावसानं ब्रेक घेतल्यामुळे उकाडा वाढला होता. परंतु आता हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिक सुखावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले होते. परंतु आता 2 दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या भागांमध्येही आज, 2 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे.
advertisement
पुणे सांगलीत अशी परिस्थिती -
पुणे आणि परिसरात 3 दिवस आभाळ ढगाळ राहील. इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात मात्र आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. इथं यलो अलर्ट देण्यात आलाय. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही हवामानशास्त्र विभागानं यलो अलर्ट दिला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
धाराशिव जिल्ह्यात मागील 28 तासांपासून सतत संततधार; नद्या, ओढे तुडुंब, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement