Health Checkup : वर्षातुन नेमकं किती वेळा आरोग्य तपासणी करावी, डॉक्टरांनी दिली तुमच्या फायद्याची माहिती..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या महाप्रलयानंतर आरोग्याच्या बाबतीत लोक जागृत झाले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : कोरोनाचे महासंकट संपूर्ण जगाने अनुभवले. त्यानंतर आता आरोग्य तपासण्या करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अशा परिस्थितीत वर्षातून किमान एक वेळा तरी आरोग्य तपासणी करावी, असा सल्ला डॉ. के. डी. दत्तासमजे यांनी दिला आहे. लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या महाप्रलयानंतर आरोग्याच्या बाबतीत लोक जागृत झाले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण कोरोना येऊन गेल्यानंतर लोकांनी आरोग्य तपासणीकडे विशेष भर दिल्याचे पाहायला मिळते. अशा परिस्थितीत वर्षातून किमान एक वेळा तरी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला एमडी पॅथॉलॉजिस्ट डॉ .के.डी दत्तासमजे यांनी दिला आहे.
advertisement
एकट्या उमरगा परिसरात कोविडनंतर लोकांचा हृदयाच्या, रक्ताच्या, शुगरच्या अशा आरोग्य तपासण्या करण्याकडे कल वाढला आहे. कोरोनाच्या अगोदर महिन्याकाठी 200 ते 300 रुग्ण आरोग्य तपासणी करीत होते. मात्र, कोरोनानंतर आता महिन्याला 500 ते 1000 रुग्ण आरोग्याची तपासणी करीत आहेत. वर्षातुन किमान एक वेळा तरी आरोग्य तपासणी करणे गरजेचे का आहे, याबाबतही त्यांनी माहिती दिली.
advertisement
जीवनशैलीतील आजारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या तपासण्यांमुळे व्यक्तींना संभाव्य आरोग्य समस्या लवकर ओळखण्यात मदत होते. यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करता येतात आणि अशी परिस्थिती टाळण्यासाठी किंवा त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत बदल करता येतात. त्यामुळे किमान वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी करावी, असा सल्ला डॉ. के. डी. दत्तासमजे यांनी दिला आहे.
advertisement
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 06, 2024 2:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Health Checkup : वर्षातुन नेमकं किती वेळा आरोग्य तपासणी करावी, डॉक्टरांनी दिली तुमच्या फायद्याची माहिती..