जीवनशैलीत करा फक्त हे 5 बदल अन् लठ्ठपणाला करा बाय बाय, महत्त्वाची माहिती..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून आपण लठ्ठपणा कमी करू शकतो. असे कोणते पाच बदल आहेत जे आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये केल्याने आपण लठ्ठपणावर विजय मिळवू शकतो, ते आपण आज जाणून घेऊयात.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : लठ्ठपणा ही भारतातील लोकांबरोबरच जगभरात मोठी समस्या बनत चालली आहे. पोटावर वाढलेल्या चरबीमुळे अनेक जण त्रस्त आहेत. लठ्ठपणा वाढल्यामुळे आपसूकच विविध आजार व्यक्तीला जडतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी विविध घरगुती उपायदेखील सांगितले जातात. मात्र, त्याचा फारसा उपयोग होतोच असे नाही.
आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून आपण लठ्ठपणा कमी करू शकतो. असे कोणते पाच बदल आहेत जे आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये केल्याने आपण लठ्ठपणावर विजय मिळवू शकतो, ते आपण आज जाणून घेऊयात. याबाबतची माहिती लठ्ठपणा तज्ञ अमृता कुलकर्णी यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
advertisement
- दररोज व्यायाम करणे - व्यायाम हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. दररोज किमान 25 मिनिटे ते कमाल 45 मिनिटे व्यायाम करावा. तसेच आठवड्याची 22 ते 25 दिवस नियमित व्यायाम केल्याने लठ्ठपणाची समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.
- तणाव विरहित जीवन - ताणतणाव हा आपल्या जीवनात अनेक बाबींवर परिणाम करत असतो. लठ्ठपणा वाढण्यासाठीही अतिरिक्त ताणतणाव कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे लहान सहान गोष्टींचा जास्त विचार न करता ताण-तणाव विरहित जीवनशैली अवलंबल्यास लठ्ठपणावर आपण नियंत्रण मिळू शकतो.
- फास्ट फूड आणि जंक फूडचे सेवन टाळावे - हल्ली फास्ट फूड आणि जंक फूड सहज उपलब्ध आहे त्यामुळे चमचमीत आणि जिभेला चवदार असणारे हे खाद्यपदार्थ खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. मात्र, हे खाद्यपदार्थ आपल्या पोटातील चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे या पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळलं पाहिजे.
- बैठे कामदरम्यान ब्रेक घ्या - हल्ली बैठे काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सतत बसून राहिल्याने देखील शरीराच्या विविध समस्या निर्माण होतात. तसेच शरीरातील चरबीचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणावर वाढते. लठ्ठपणा वाढण्यास बैठके काम हे देखील कारणीभूत आहे. त्यामुळे तुमचे काम जर बसून असेल तर अर्ध्या किंवा पाऊण तासाने तुम्ही तीन ते पाच मिनिटे चालणे, हात पाय हलवणे अशा प्रकारचे ब्रेक घ्या. यामुळे तुमचे मेटाबॉयलिजम चांगले होऊन लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल.
- दोन जेवणामध्ये काहीही सेवन करू नका - हल्ली बरेचजण जेवण झाल्यानंतर काही वेळाने लागणाऱ्या छोट्या भुकेसाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ खात असतात. यामुळे तुमचे जेवणाचे टाईम टेबल बिघडते. त्यामुळे 2 जेवणाच्या मध्ये अजिबात कुठलेही खाद्यपदार्थ खाऊ नये. तसेच भरपेट जेवन न करता पोट थोडे रिकामे ठेवा. यामुळे तुमची पाचनशक्ती उत्तम राहून लठ्ठपणा टाळण्यास मदत होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
सूचना : ही माहिती आरोग्यतज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. कोणत्याही गोष्टीचे सेवन करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Aug 06, 2024 12:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जीवनशैलीत करा फक्त हे 5 बदल अन् लठ्ठपणाला करा बाय बाय, महत्त्वाची माहिती..








