बटाट्याचा पराठा हा मनु भाकरचा आवडीचा पदार्थ, सोपी आहे रेसिपी, पाहा VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
मनू भाकरने एका मुलाखतीत ती प्रचंड फुडी असल्याच सांगितलेय त्याचबरोबर तिचा आवडता खाद्यपदार्थ बटाट्याचे पराठे आहे, असे तिने सांगितले. हेच बटाट्याचे पराठे कसे करायचे, याची रेसिपी आज जाणून घेऊया.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : मनु भाकर या नावाची देशभरात चर्चा आहे. नेमबाजीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्याच दिवशी पदकांचे खात उघडून दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक पदक जिंकत मनु भाकरने इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पकमध्ये दोन पदके जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू बनली आहे.
मनू भाकरने एका मुलाखतीत ती प्रचंड फुडी असल्याच सांगितलेय त्याचबरोबर तिचा आवडता खाद्यपदार्थ बटाट्याचे पराठे आहे, असे तिने सांगितले. हेच बटाट्याचे पराठे कसे करायचे, याची रेसिपी आज जाणून घेऊया.
advertisement
साहित्य - चार उकडलेले बटाटे, गव्हाचे पीठ, कोथिंबीर, तेल एक वाटी, सहा ते सात बारीक चिरलेली मिरची, अर्धा चमचा हळद, मोहरी, जिरे, नऊ ते दहा पानं कढीपत्ता आणि चवीपुरतं मीठ.
कृती - सर्वप्रथम गव्हाचे पीठ व्यवस्थित मळून घ्या. ज्या पद्धतीने आपण चपातीला पीठ मळतो तसाच पिठाचा गोळा करा. उकडलेली बटाटी बारीक करून घ्या. गॅसवर कढई ठेवा. कढई गरम झाली की त्यात तेल घाला. त्या तेलात सर्वप्रथम कडीपत्ता, जिरे, राई, मिरची, हळद हे सर्व मिक्स करून घ्या. त्यानंतर मीठ आणि बारीक केलेली उकडलेली बटाटे घालून एक जीर्ण करून घ्या.
advertisement
महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन शिव मंदिरात ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मूर्ती; बांधकाम पाहूनच व्हाल अवाक्, VIDEO
अशाप्रकारे आपली पराठ्याला लागणारी भाजी तयार झालेली आहे. भाजी तयार झाल्यानंतर चपातीचे पीठ जे मळलेले असेल त्याचे व्यवस्थित गोळे करा आणि थोडं लाटल्यानंतर त्यात दोन चमचे बनवलेली बटाट्याची भाजी घाला आणि गोळा पुन्हा बंद करून लाटा. आता हलक्या हाताने हळूहळू चपाती गोल करा आणि चपाती झाल्यानंतर ती व्यवस्थित तव्यावर शेकवा. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर तुमचा पराठा तयार झालेला असेल. अशा पद्धतीने तुम्ही हे पराठे करून सॉस किंवा चटणी बरोबर खाऊ शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2024 5:35 PM IST