महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन शिव मंदिरात ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मूर्ती; बांधकाम पाहूनच व्हाल अवाक्, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात प्राचीन शिवमंदिर आहे. धाराशिवपासून 100 किलोमीटर तर चालुक्यांची राजधानी बसवकल्याणपासून 45 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हे शिवमंदिर चालुक्य काळातील असून याचा आकार तारकाकृती आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. श्रावण महिन्यातील सोमवारचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराची आराधना केली जाते. त्यामुळे या महिन्यातील श्रावण सोमवारच्या पुजेचे विशेष पुण्य लाभते, असे सांगितले जाते. श्रावण महिन्याच्या निमित्ताने शंकराच्या मंदिरातही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आज आपण अशाच एका अत्यंत प्राचीन मंदिराविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात प्राचीन शिवमंदिर आहे. धाराशिवपासून 100 किलोमीटर तर चालुक्यांची राजधानी बसवकल्याणपासून 45 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हे शिवमंदिर चालुक्य काळातील असून याचा आकार तारकाकृती आहे.
पहिला श्रावण सोमवार, खडकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, छ. संभाजीनगरमधील Photos
हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिराची बांधणी पंचरथ पद्धतीची आहे. मंदिराचे अधिष्ठान उंच जोत्यावर आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश यांची अत्यंत प्राचीन मूर्ती या मंदिरात आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, तीन गर्भगृहे अशी आहे. तसेच प्रत्येक गर्भगृहाला स्वतंत्र सभामंडप आहे.
advertisement
मंदिरात कीर्ती मुखाच्या कलाकृती, शिवनृत्य, सप्तमातृका, अष्टदिक्पाल आणि शोभायमान छत ही येथील वैशिष्टये ठरतात. येथील गर्भगृहात भितीला लागून पिठावर विष्णूची चतुर्भुज मूर्ती आहे आणि खाली शिवपिंड आहे. डावीकडील गर्भगृहात शिवपिंड आहे. उजवीकडील गर्भगृहात ब्रह्मा आहेत. या दोन्ही गर्भगृहाच्या दरवाजावरील शिल्पे वैष्णव आहेत तर मध्यवर्ती गर्भगृहाच्या द्वारावरील शिल्पे शैव आहेत.
Mhada lottery 2024 : म्हाडाच्या घरासाठी नेमका कसा अर्ज करतात, काय आहे पात्रता?, संपूर्ण माहिती अगदी सोप्या शब्दात..
मंदिराबाहेरील बाजूवरही कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले आहे. मंदिराच्या समोर भव्य नंदी मंडप आहे. हे शिव मंदिर स्थापत्य शैलीचा अद्भुत नमुना आहे. उमरगा शहरातील हे शिव मंदिर चालुक्यकालीन स्थापत्य शैलीचा अद्भुत नमुना आहे. मंदिरावर अंतर्बाह्य कोरीव नक्षीकाम आहे. तारकाकृती असलेले हे मंदिर अतिशय भव्य आहे.
advertisement
मंदिरात दर्शनासाठी दररोज भाविकांची गर्दी असते. आज श्रावण सोमवार निमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 05, 2024 2:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन शिव मंदिरात ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मूर्ती; बांधकाम पाहूनच व्हाल अवाक्, VIDEO