नवरात्रौत्सवात तुळजाभवानी मंदिराचं रुपडंच पालटलं, आताचं शिखर तुम्ही पाहिलंत का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजापूरची तुळजाभवानी देवी ओळखली जाते. यंदा नवरात्री उत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिराला आकर्षक रंगकाम करण्यात आलंय.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजापूरची आई तुळजाभवानी ओळखली जाते. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असणाऱ्या तुळजापुरात शारदीय नवरात्रीत मोठा उत्सव असतो. देशभरातून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी तुळजापूर मंदिरात आकर्षक सजावट आणि रोषणाई केली जाते. यंदा तुळजाभवानी मंदिराच्या शिखराचं एक वेगळं रुप दिसत असून आकर्षक रंगकाम करण्यात आलंय.
तुळजाभवानी मंदिरात मुख्य शिखरासह अन्य दोन शिखरे आहेत. यंदा नवरात्री उत्सवानिमित्त मुख्य शिखरासह भवानी शंकर शिखर आणि होम कुंडावरील शिखरांना आकर्षक रंगकाम करण्यात आलंय. तसेच घाटशिळ येथील मंदिराच्या शिखरालाही रंगवण्यात आलंय. विशेष म्हणजे शिखरांचे आकर्षक रंगकाम पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करण्यात आले आहे, अशी माहिती पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिलीये.
advertisement
दरम्यान, तुळजाभवानी मंदिराच्या शिखरास आकर्षक रंगकाम केल्यानं मंदिराचं रुपडं पालटलंय. त्यामुळे नवरात्रीत आलेल्या भाविकांना तुळजाभवानी मंदिराचं एक वेगळं रूप पाहण्यास मिळत आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
October 04, 2024 10:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
नवरात्रौत्सवात तुळजाभवानी मंदिराचं रुपडंच पालटलं, आताचं शिखर तुम्ही पाहिलंत का?