उद्धव ठाकरेंची पाठ फिरताच नेत्याची अवघ्या 24 तासांत घरवापसी; पुन्हा शिवसेनेत प्रवेश

Last Updated:

धाराशिवमध्ये ठाकरे गटाला धक्का बसला आहे, ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्यानं अवघ्या 24 तासांत पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

News18
News18
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : धाराशिवमधून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्यानं अवघ्या 24 तासांत घरवापसी केली आहे. देवानंद रोचकरी यांनी मंत्री तानाजी सावंत आणि राणा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपण महायुतीचा प्रचार करणार असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर आले असताना देवानंद रोचकरी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर अवघ्या 24 तासांत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांची घरवापसी झाली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाला हा मोठा धक्का दिला आहे.
देवानंद रोचकरी यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्यानं तुळजापूरमध्ये ठाकरे गटाला फटका बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर असताना रोचकरी यांनी शिवसेनेची साथ सोडत आपल्या समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र उद्धव ठाकरे दौरा आटपून मागे फिरताच त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत  प्रवेश केला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश झाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
उद्धव ठाकरेंची पाठ फिरताच नेत्याची अवघ्या 24 तासांत घरवापसी; पुन्हा शिवसेनेत प्रवेश
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement