'इंजेक्शन द्यायचंय आत या', कराडमध्ये डॉक्टरचं विवाहितेसोबत नको ते कृत्य, जमावाने दिला चोप

Last Updated:

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका डॉक्टरने महिला रुग्णासोबत अश्लील वर्तन केलं आहे.

News18
News18
विशाल पाटील, प्रतिनिधी सातारा: सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका डॉक्टरने महिला रुग्णासोबत अश्लील वर्तन केलं आहे. या घटनेची माहिती महिलेनं आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरला बेदम चोप दिला आहे. तसेच संतप्त जमावाने रुग्णालयाची देखील तोडफोड केली आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
ही घटना कराड विमानतळ परिसरातील एका गावात घडली आहे. येथील एका आजारी महिलेसोबत डॉक्टरने दवाखान्यात गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉक्टरला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिला असून त्यास पोलिसांच्या हवाली केले आले आहे. डॉ. अल्ताफ हुसेन उस्मानसा नदाफ असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पीडित महिला आपल्या सासूसोबत दवाखान्यात गेली होती. त्यावेळी दवाखान्यातील पडदा ओढत तपासणीच्या बहाण्याने आणि इंजेक्शन करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने संबंधित विवाहितेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या विवाहितेने या प्रकाराची माहिती सासूला दिली नव्हती. मात्र माहेरी गेल्यानंतर विवाहितेने तिच्या आईला या प्रकाराची कल्पना दिली. तसेच परगावी असणार्‍या पतीला घडलेला प्रकार सांगितला.
advertisement
शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांना जाब विचारण्यासाठी संबंधित विवाहितेचे नातेवाईक गेले असता त्या ठिकाणी उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी डॉक्टरला चोप दिला. यावेळी पलायन करण्याच्या प्रयत्नातील डॉक्टरला रोखून धरत विवाहितेच्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील या तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'इंजेक्शन द्यायचंय आत या', कराडमध्ये डॉक्टरचं विवाहितेसोबत नको ते कृत्य, जमावाने दिला चोप
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुक पुढं जाणार की आरक्षण बदलणार?  सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट....
बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर
  • बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर

  • बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर

  • बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर

View All
advertisement