लोकसभेवेळचं समीकरण भोवलं? संजीवराजेंच्या निवासस्थानावर छापे, छाप्यामागचं कारण आणि राजकारण!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sanjivraje Nimbalkar ED Raid: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संजीवराजे निंबाळकर प्रवेश करण्याच्या बातम्या येत होत्या. त्यातच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले.
चंद्रकांत फुंदे, सातारा : फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलतबंधू संजीवराजे आणि रघुनाथ यांच्या घरांवर आयकर विभागाने अचानक छापे टाकले.छाप्यांमागे नेमकं कारण काय असावे, यासंदर्भाने राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आलाय. गोंविद दूध डेअरीच्या हिशेबाचं कारण देऊन हे छापे पडलेत खरे मात्र यामागे सत्ताधाऱ्यांचा राजकीय दबावतंत्राचा डाव असल्याचं बोललं जातंय.
विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांच्या पक्षाकडे गेलेले संजीवराजे निंबाळकर स्वगृही परतणार होते. स्वगृही म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संजीवराजे निंबाळकर प्रवेश करण्याच्या बातम्या येत होत्या. त्यातच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले.
फलटण, पुणे आणि मुंबईतील घरांवर एकाच वेळी छापे
संजीवराजे आणि रघुनाथराजे यांच्या फलटण, पुणे आणि मुंबईच्या घरांवर एकाचवेळी धाडसत्र सुरू होतं. संजीवराजे निंबाळकरांच्या गोविंद दूध डेअरी संदर्भातील काही तक्रारींच्या अनुषंगाने छापे पडल्याचे ,सांगितले जात आहे. रामराजे आणि संजीवराजे निंबाळकरच्या समर्थकांना मात्र या छाप्यांमागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय येतोय.
advertisement
छाप्यांमागील कारण आणि राजकारण
छाप्यांमागे राजकारण असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण लोकसभा निवडणुकीत माढ्याची जागा भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली नव्हती. त्यामुळे रामराजे घराण्याने बंड करून मोहिते पाटलांना पाठिंबा दिला होता. तर विधानसभा निवडणुकीत संजीवराजेंनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार दीपक शिंदेंचा पराभव झाला होता. त्यामुळे संजीवराजे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली होती. पण रामराजे घराण्यावर भाजपचाही राजकीय डोळा असल्याचं बोललं जातंय.
advertisement
त्याच दबावतंत्राचा भाग म्हणून ही छापेमारी झाल्याचं बोललं जातंय. पण समजा खरंच भाजपला रामराजे घराणं त्यांच्या पक्षात हवं असेल तर मग रणजीत निंबाळकरांचं काय? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. कारण या दोन्ही निंबाळकरांमधून विस्तवही जात नाही आणि यामुळेच छाप्यांमागचं कारण अजूनही उलगडत नाही.
Location :
Phaltan,Satara,Maharashtra
First Published :
February 05, 2025 8:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लोकसभेवेळचं समीकरण भोवलं? संजीवराजेंच्या निवासस्थानावर छापे, छाप्यामागचं कारण आणि राजकारण!