Eknath Shinde-Amit Shah meeting: दिल्लीत अमित शाहांच्या घरी बैठक संपली, मुख्यमंत्रिपदाबद्दल काय निर्णय झाला?

Last Updated:

गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे हे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.

News18
News18
दिल्ली : विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता लवकरच महायुती सरकार स्थापन होणार आहे.  पण  मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दल अजूनही सस्पेन्स कायम आहे.  गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले होते. चारही नेत्यांची अडीच तास बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजपचा गटनेता शुक्रवारी ठरणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद आणि इतर महत्त्वांच्या खात्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अखेरीस गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे हे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर दुसरीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सुनील तटकरे यांच्या घरी बैठक झाली. शिंदे आणि शाहांची बैठक संपल्यानंतर अमित शाहांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पोहोचले. जवळपास अडीच तास ही बैठक चालली होती.
advertisement
या बैठकीमध्ये भाजपकडे मुख्यमंत्रिपद आणि गृहखातं राहणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे नगरविकास आणि पीडब्ल्यूडी खातं मिळण्याची शक्यता आहे. तर  अजित पवारांना अर्थखातं आणि उपमुख्यमंत्रिपद मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर 1 डिसेंबरला महायुतीची मुंबईत बैठक होणार आहे. यासाठी  भाजपकडून २ निरीक्षक मुंबईत येणार आहे.
advertisement
एकनाथ शिंदे यांनी काय दिले प्रस्ताव?
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  शिवसेनेकडून अमित शाह यांच्याकडे मांडण्यात आले ४ प्रस्ताव देण्यात आले आहे.
प्रस्ताव 1
मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे ठेवणार असाल तर शिवसेनेकडे आधी असलेली खाती तशीच ठेवा
प्रस्ताव २
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देणार नसाल तर शिवसेनेला त्यांच्या कोट्यापेक्षा अधिकची ५ महत्त्वाची खाती द्यावी
प्रस्ताव ३
शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असतील तर गृहमंत्री किंवा अर्थमंत्री द्यावे.
advertisement
प्रस्ताव ४
शिवसेनेकडून अन्य कुणी उपमुख्यमंत्री होणार असेल तर त्यांना गृहमंत्री आणि अर्थमंत्री भाजपकडून देणार नसाल. तर इतर खाती वाढवून द्यावी. ४ ते ५ खाती वाढवून द्यावी.
 दरम्यान, दिल्लीत पोहोचल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, "महायुतीच्या मुख्यमंत्र्यांबाबत कोणताही अडथळा नसल्याची मी काल पत्रकार परिषदेत माझी भूमिका स्पष्ट केली आहे. लाडका भाई दिल्लीत आले आणि लाडका भाई हे पद माझ्यासाठी कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठे आहे. बैठकीत सर्व बाबींवर चर्चा होईल"
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde-Amit Shah meeting: दिल्लीत अमित शाहांच्या घरी बैठक संपली, मुख्यमंत्रिपदाबद्दल काय निर्णय झाला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement