KDMC: महापौर शिवसेनेचाच! मनसेला सोबत घेत शिंदेंनी गेम फिरवला, युतीमधील भाजप विरोधी बाकावर? मोठी राजकीय उलथापालथ

Last Updated:

KDMC : शिवसेना शिंदे गटाने आता थेट भाजपचा गेम केला असून कल्याण डोंबिवलीमध्ये आपला महापौर बसवण्यासाठीच्या आकडेवारीची जुळवाजुळव केली आहे.

महापौर शिवसेनेचाच! शिंदेंनी गेम फिरवला, युतीमधील भाजप विरोधी बाकावर? KDMC मोठी उलथापालथ
महापौर शिवसेनेचाच! शिंदेंनी गेम फिरवला, युतीमधील भाजप विरोधी बाकावर? KDMC मोठी उलथापालथ
कल्याण: महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता संख्याबळ आणि सत्ता स्थापनेचा गेम सुरू झाला आहे. शिवसेना शिंदे गटाने आता थेट भाजपचा गेम केला असून कल्याण डोंबिवलीमध्ये आपला महापौर बसवण्यासाठीच्या आकडेवारीची जुळवाजुळव केली आहे. शिंदे गटाच्या मदतीला मनसेने आपल्या पाठिंब्याचे इंजिन जोडलं आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये युतीत लढलेल्या भाजपवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत.
मागील काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीमधील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला होता. ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर आज मोठी घडामोड ठरली. नवी मुंबईत कोकण भवन येथे नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यासाठी आलेल्या शिवसेना शिंदे गटाने आपली मोठी खेळी खेळली. कल्याण डोंबिंवलीमध्ये शिवसेना-मनसेचा महापौर होणार असल्याचा दावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला.
advertisement
शिवसेना शिंदे गटाने कोकण आयुक्ताकडे महापालिकेतील सत्ता स्थापनेचा दावा केला. शिवसेना शिंदे गटाकडे ५३, ठाकरे बंडखोर-४ आणि मनसे ५ असे संख्याबळ आहे. ठाकरेंच्या ४ बंडखोरांपैकी दोनजण हे मनसेचे होते. त्यांनी ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली. तर, दोन जण हे शिंदे गटातून उमेदवारी न मिळाल्याने ठाकरे गटातून निवडणूक लढवून विजयी झाले होते.
advertisement
कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी युती केली होती. भाजपचे ५० उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर भाजपकडून अडीच-अडीच वर्षासाठीच्या महापौर पदाची मागणी करण्यात आली होती. आता मनसेला सोबत घेत शिंदे गटाने बहुमताचा आकडा गाठला. त्यामुळे भाजपला धक्का बसला असून सत्तेपासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC: महापौर शिवसेनेचाच! मनसेला सोबत घेत शिंदेंनी गेम फिरवला, युतीमधील भाजप विरोधी बाकावर? मोठी राजकीय उलथापालथ
Next Article
advertisement
ZP Election NCP: घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी मोठा डाव...
घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी म
  • आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू

  • राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून

View All
advertisement