अभिनेत्री राखी सावंतला गोळ्या घाला, शिवसेना नेते संजय गायकवाड यांचे वक्तव्य

Last Updated:

Sanjay Gaikwad: अभिनेत्री राखी सावंत हिने पाकिस्तानचा जय केल्याचा प्रश्न गायकवाड यांना विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना थेट तिला गोळ्या घाला, असे गायकवाड म्हणाले.

संजय गायकवाड-राखी सावंत
संजय गायकवाड-राखी सावंत
बुलढाणा: शिवसेनेचे नेते, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अभिनेत्री राखी सावंतला गोळ्या घाला, असे वक्तव्य केले आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर सगळीकडून पाकिस्तानविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असताना राखी सावंत हिने पाकिस्तानचा जयजयकार केला होता.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शहरातील पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. अभिनेत्री राखी सावंत हिने पाकिस्तानचा जय केल्याचा प्रश्न गायकवाड यांना विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना थेट तिला गोळ्या घाला, असे गायकवाड म्हणाले.

इथे गोळ्या घाला आणि पाकिस्तानात गाडा

राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजेत. राखी सावंतसारखी महिला ही महिलांच्या नावावर कलंक आहे. राखी सावंत ही भारतात पैसे कमावते, भारतात खाते, भारतात आराम करते आणि विरोधी देशाच्या जयजयकाराचा नारा देते, तिला तिकडेच गाडले पाहिजे. तिला भारतात येऊ देता कामा नये, असे संजय गायकवाड म्हणाले.
advertisement

राखी सावंत काय म्हणाली होती?

माझं नाव अभिनेत्री राखी सावंत. मी नेहमी खरे बोलते, खोटे बोलत नाही. पाकिस्तानी लोकांना मी तुमच्या सोबत आहे. जय पाकिस्तान, असा व्हिडीओ पहलगाम हल्ल्यानंतर व्हायरल झाला होता. पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवर हल्ला झाल्यानंतर त्यांची बाजू घेण्याऐवजी पाकिस्तानची बाजू घेतल्याने तिला देशद्रोही म्हणत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली.
advertisement

संजय गायकवाड कोण आहे?

संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत
बुलढाणा शहर मतदारसंघातून ते आमदार झाले आहेत
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी निसटत्या मतांनी ते विजयी झाले आहेत
संजय गायकवाड हे सतत वादग्रस्त वक्तव्ये करीत असतात
राहुल गांधी यांची जीभ छाटा, असे वक्तव्य त्यांनी मध्यंतरी केले होते
advertisement
सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांना समजही दिली होती
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अभिनेत्री राखी सावंतला गोळ्या घाला, शिवसेना नेते संजय गायकवाड यांचे वक्तव्य
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement