Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना व्होट चोरीची भीती? मुंबईतील आमदारांच्या बैठकीत दिले महत्त्वाचे आदेश
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:UDAY JADHAV
Last Updated:
Eknath Shinde : दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी काही सूचना केल्यात. निवडणुकीत होत असलेल्या व्होट चोरीच्या आरोपानंतर शिंदे गटही सावध झाल्याचे चित्र आहे.
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी काही सूचना केल्यात. निवडणुकीत होत असलेल्या व्होट चोरीच्या आरोपानंतर शिंदे गटही सावध झाल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत व्होट चोरी करून भाजप-एनडीएचं सरकार सत्तेत आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. या व्होट चोरीच्या आरोपाच्या पुष्टीसाठी त्यांनी कर्नाटकमधील एका मतदारसंघाची आकडेवारी सादर करत काही गौप्यस्फोट केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सत्ताधारी बाकांवरून राहुल गांधींवर टीकेचा भडिमार करण्यात आला. तर, विरोधकांनी त्यांची बाजू उचलून धरली होती.
advertisement
एकनाथ शिंदेंकडून निवडणूक तयारीचा आढावा...
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकांना सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील आमदार, मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केली. महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य नको असेही त्यांनी म्हटले. युतीचा फॉर्म्युला काय असावा त्याची तयारी करा , प्रत्येक जागेबाबतचा दावा पटवता आला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. येणारी निवडणुक महत्वाची असून महापालिका निवडणुक कामांच्या जोरावर जिंकू शकतो असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
advertisement
शिंदे गटाला व्होट चोरीची धास्ती?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, पुढची निवडणुक मिनी विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा. तुम्हाला ज्यांनी मंत्री आमदार केलं त्यांना नेता बनवा असे आवाहन त्यांनी केले.
मतदार याद्यांबाबतही एकनाथ शिंदे यांनी सूचना केली. मतदार याद्या अपडेट करण्यास त्यांनी सांगितले. या मतदार याद्यांसाठी एक ॲप तयार केलंय असून राज्यात त्यासाठी ट्रेनिंग होणार आहे. मतदार यादीतील बोगस नावांवर लक्ष ठेवा, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.
advertisement
राहुल गांधी यांनी व्होट चोरीचा आरोप करताना दुबार मतदारांसह बोगस मतदारांचाही उल्लेख करत काहीजणांचे फोटो दाखवले होते. या शेकडो संशयित बोगस मतदारांच्या घराचे पत्ते, नाव अशा विविध गोष्टीवर संशय उपस्थित झाला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीदेखील मतदार याद्यांवर कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना व्होट चोरीची भीती? मुंबईतील आमदारांच्या बैठकीत दिले महत्त्वाचे आदेश