EVM मध्ये सर्वात मोठा बदल, निवडणूक आयोगाचे ऐतिहासिक पाऊल, बिहारपासून श्रीगणेशा

Last Updated:

बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासण्यांचा (SIR) मुद्दा देशभर चर्चेत असतानात भारतीय निवडणूक आयोगाने बिहार निवडणुकीपासूनच मतदान यंत्रावर उमेदवाराचा रंगीत फोटो लावण्याचा निर्णय घेतला.

निवडणूक आयोग
निवडणूक आयोग
नवी दिल्ली : पारदर्शक निवडणुकीचे दावे करणाऱ्या भारतीय निवडणूक आयोगाने ऐतिहासिक पाऊल उचलत मतदान यंत्रावर नाव आणि चिन्हासह उमेदवारांचा रंगीत फोटोही लावण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासण्यांचा मुद्दा देशभर चर्चेत असतानात भारतीय निवडणूक आयोगाने बिहार निवडणुकीपासूनच मतदान यंत्रावर उमेदवाराचा रंगीत फोटो लावण्याचा निर्णय घेतला.
दिवाळी सणानंतर बिहार विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीआधीच राजकीय पक्षांमध्ये वर प्रतिवार होत आहेत. या वादापासून निवडणूक आयोगही दूर नाही. निवडणूक आयोगाच्या मतदार यादी फेरतपासणीवर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवून प्रक्रिया थांबविण्याची विनंती केली. हा वाद देशभर गाजत असताना निवडणूक आयोगाने बुधवारी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून स्तुत्य निर्णय घेतला.
advertisement

मतदान यंत्रावर रंगीत फोटो का?

अनेक वेळा नाम साधर्म्यामुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडतो. तोच गोंधळ टाळण्यासाठी तसेच मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी मतदान यंत्रावर उमेदवारांचे फोटो असावेत, अशी मागणी अनेक वर्षे करण्यात येत होती. अखेर निवडणूक आयोगाने बिहारपासून श्रीगणेशा करून सजग मतदारांना चांगली भेट दिली आहे. मतदारांना दिसेल असा ठसठशीत आणि ठळक फोटो छापण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत.
advertisement
दुसरीकडे उमेदवारांच्या नावांवरून, नामसाधर्म्यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी सगळी नावे एकसमान फॉन्टमध्ये असतील. जेणेकरून मतदारांना वाचण्यात कुठलीही अडचण येणार नाही. निवडणूक आयोगाने उमेदवारांचे सिरियल नंबर आणि नोटाचा पर्यायही अधिक ठळक करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातही मतदार याद्यांची फेर तपासणी

बिहारमध्ये वादग्रस्त ठरलेल्या मतदार याद्यांच्या फेरतपासणीचा मुद्दा महाराष्ट्रातही डोकावणार आहे. कारण बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची फेरतपासणी होणार आहे. देशभरातील मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याच्या तयारीत निवडणूक आयोग आहे. देशभरातील मतदार याद्यांची फेर तपासणीचा आढावा भारतीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. महाराष्ट्रात महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
EVM मध्ये सर्वात मोठा बदल, निवडणूक आयोगाचे ऐतिहासिक पाऊल, बिहारपासून श्रीगणेशा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement