एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 'चमको' आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

Last Updated:

राज्यभरातील नगर परिषदांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आमदार संतोष बांगर यांची वहिनी निवडणूक रिंगणात असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

संतोष बांगर (आमदार)
संतोष बांगर (आमदार)
मनीष खरात, प्रतिनिधी, हिंगोली : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्रात जाऊन चमकोपणा नडल्याने त्यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
राज्यभरातील नगर परिषदांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आमदार संतोष बांगर यांची वहिनी निवडणूक रिंगणात असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानासाठी आज अगदी सकाळीच मतदान केंद्रावर गेल्यानंतर आमदार बांगर यांनी एका महिलेला मतदान कुठे आणि कसे करायचे, हे सांगितल्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.
आज सकाळी हिंगोली शहरातील मंगळवार बाजार भागातील जिल्हा परिषद कन्या शाळा मतदान केंद्रावर मतदान करत असताना आमदार संतोष बांगर यांनी एका महिलेला मतदान करण्यासंदर्भात बोट दाखवून सूचना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात मतदान गोपनीयतेचा भंग झाल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement

मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास बंदी, तरीही मोबाईल नेऊन शूटिंग

आमदार संतोष बांगर हे मंगळवारी सकाळी त्यांच्या भागातील बुथवर मतदान करायला गेले होते. रांगेतील महिलेला मतदान कसे करायचे हे त्यांनी बोट दाखवून सांगितले. तसेच मतदान होत असलेल्या खोलीत त्यांनी घोषणाही दिल्या. निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास परवानगी नाही. असे असूनही आमदार बांगर यांनी मोबाईल नेऊन चित्रिकरण केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 'चमको' आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement