Weather Alert: कल्याण-डोंबिवलीतील हवामानात मोठे बदल, 23 जानेवारीला अलर्ट!

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून ठाणे-मुंबईत देखील हवापालट झाल्याचे चित्र आहे.
1/5
जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीची तीव्रता ओसरत असून तापमानात काही प्रमाणात वाढ होत आहे. पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे परिसरातील हवामान मुख्यत: कोरडं आणि स्थिर राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 23 जानेवारी रोजी कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.

advertisement
2/5
कल्याण तालुक्यात हवामान स्वच्छ आणि उबदार राहील. पुढील काही दिवस सकाळच्या वेळी थोडी थंडी आणि दिवसा उबदारपणा जाणवेल. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल 33 अंश सेल्सिअस राहील. कल्याण परिसरात उन्हाळ्याची चाहुल लागल्याची हवामान स्थिती आहे.

3/5
डोंबिवली शहरातील हवामान शुक्रवारी निरभ्र आणि अंशतः ढगाळ राहील. सकाळी उशिरा पर्यंत धुक्याची हलकी चादर असेल. किमान तापमान 23 अंश तर कमाल 32 अंश सेल्सिअस असेल. दिवसा उबदार आणि रात्री हवा थंड जाणवेल.

4/5
कल्याण-डोंबिवलीतील ग्रामीण भागातल्या हवामानात गेल्या 2 दिवसांत मोठे बदल जाणवत आहेत. आता या परिसरात देखील हवामान थंड आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 15 अंश तर कमाल 28 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दिवसा हवामान सुखद आणि रात्री-सकाळी थोडे थंड जाणवेल.

5/5
बदलापूरमध्ये गुरुवारपर्यंत हवामान स्थिर होते. आज मात्र किमान तापमानात थोडी वाढ झाली असून ते 13 अंश सेल्सिअसवर गेले आहे. तर कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस असेल. शहापूर, मुरबाड परिसरात देखील तापमानत वाढ होत असून किमान तापमान 18 तर कमाल 32 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray : बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
  • महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू आहे.

  • मनसे मुंबईत उद्धव यांची साथ सोडून थेट महायुतीला पाठिंबा देतील अशी चर्चा

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

View All
advertisement