२६ वर्षांनी आली संधी! नाशिक महापौर पदासाठी १६ जणी मैदानात, वाचा संपूर्ण यादी

Last Updated:

Nashik Mayor : महापालिकेच्या आरक्षण सोडतीत तब्बल २६ वर्षांनंतर महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने नाशिकच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे.

Nashik Election 2026
Nashik Election 2026
नाशिक : महापालिकेच्या आरक्षण सोडतीत तब्बल २६ वर्षांनंतर महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने नाशिकच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. १९९९ मध्ये डॉ. शोभा बच्छाव यांनी हे पद भूषवले होते. त्यानंतर पहिल्यांदाच खुल्या प्रवर्गातील महिला महापौर होणार असल्याने इच्छुकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाषा प्रभुत्व, प्रशासकीय अनुभव, नेतृत्व क्षमता आणि राजकीय समन्वय या निकषांवरून भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नेतृत्वक्षम चेहऱ्याचा शोध
सिंहस्थ कुंभमेळा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक सोहळा असल्याने महापौरपदासाठी केवळ राजकीय ताकद नव्हे, तर प्रशासन हाताळण्याची क्षमता, बहुभाषिक संवाद कौशल्य आणि निर्णयक्षमता महत्त्वाची ठरणार आहे. याच निकषांवर सध्या १६ महिला नगरसेविकांमधून काही प्रमुख नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये हिमगौरी आहेर, दीपाली गिते, डॉ. योगिता हिरे आणि माधुरी बोलकर या नावांची विशेष चर्चा सुरू आहे.
advertisement
हिमगौरी आहेर
४२ वर्षीय हिमगौरी आहेर या शिक्षण आणि राजकीय अनुभव या दोन्ही बाबतीत सक्षम मानल्या जात आहेत. बीई (आयटी) आणि एमबीए असे उच्च शिक्षण घेतलेल्या हिमगौरी आहेर या सलग तिसऱ्यांदा नगरसेविका आहेत. महिला मोर्चा उपाध्यक्ष, महिला मोर्चा शहराध्यक्ष, स्थायी समिती सभापती आणि शहर सरचिटणीस अशी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहेत. माजी मंत्री दौलतराव आहेर यांचा वारसा आणि आहेर कुटुंबाचा राजकीय अनुभव हेही त्यांचे बलस्थान मानले जाते.
advertisement
दीपाली गिते
३९ वर्षीय दीपाली गिते या गेल्या दहा वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. औपचारिक शिक्षण १२ वीपर्यंत असले तरी संघटनात्मक कामाचा त्यांना मोठा अनुभव आहे. पती नगरसेवक आणि दोन वेळा स्थायी समिती सभापती असताना त्यांनी प्रभागातील नागरी समस्या हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवले असून सहकारी पतसंस्थांचे अध्यक्षपद भूषवण्याचा अनुभवही त्यांच्याकडे आहे.
advertisement
डॉ. योगिता हिरे
डॉ. योगिता हिरे या उच्चशिक्षित आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. एमए हिंदी आणि पीएचडीपर्यंत शिक्षण घेतलेल्या योगिता हिरे या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व ठेवतात. माजी मंत्री प्रशांत हिरे यांची सून आणि माजी आमदार अपूर्व हिरे यांची पत्नी असल्याने हिरे कुटुंबाचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे. शिक्षण संस्था आणि सहकार क्षेत्रातील अनुभवामुळे त्या सक्षम दावेदार मानल्या जात आहेत.
advertisement
माधुरी बोलकर
३६ वर्षीय माधुरी बोलकर या सलग दुसऱ्यांदा नगरसेविका आहेत. २०१२ पासून भाजपशी निष्ठावान असलेल्या माधुरी बोलकर या कार्यकर्ती म्हणून ओळखल्या जातात. मंत्री जयकुमार रावल, गिरीश महाजन यांच्याशी निकट संबंध आणि पतीचा भाजपमधील सक्रिय सहभाग हे त्यांचे बलस्थान आहे. पश्चिम भागातून संधी मिळण्याची शक्यता असल्याने त्यांचे नावही चर्चेत आहे.
advertisement
इतर इच्छुक महिला नगरसेविका
याशिवाय जुई शिंदे, चंद्रकला धुमाळ, नीलम पाटील, रोहिणी पिंगळे, स्वाती भामरे, संगीता घोटेकर, भारती ताजनपुरे, जयश्री गायकवाड, श्वेता भंडारी, साधना मटाले, प्रतिभा पवार, छाया देवांग आणि डॉ. दीपाली कुलकर्णी या महिला नगरसेविकाही खुल्या प्रवर्गातून निवडून आल्याने महापौरपदाच्या शर्यतीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
२६ वर्षांनी आली संधी! नाशिक महापौर पदासाठी १६ जणी मैदानात, वाचा संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Mumbai Mayor Reservation: अ, आ, इ, ई... आणि मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी प्रवर्ग बाहेर पडण्याचं खरं कारण
अ, आ, इ, ई... अन् मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी बाहेर का?
  • मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

  • महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता.

  • ओबीसींसाठी मुंबईचं महापौर पदाचं आरक्षण का लागू झालं नाही, असा प्रश्न उपस्थित करण

View All
advertisement