सरकारला घेरणार, वाढदिवशी कुटुंबासह घरासमोरच्या अंगणातच उपोषण करणार, शेतकरी नेत्याचा निर्णय

Last Updated:

शेतकऱ्यांचे खूप हाल होतायेत. दररोज शेतकरी आत्महत्या करतायेत. अशावेळी वाढदिवस साजरा करताना कोणतेही बॅनर लावू नका, पुष्पगुच्छ आणू नका असे आवाहन तुपकर यांनी केले आहे.

रविकांत तुपकर
रविकांत तुपकर
राहुल खंडारे, बुलडाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर हे जन्मदिवसाच्या दिवशी म्हणजे १३ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत घराच्या अंगणात सहकुटुंब अन्नत्याग करणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह इतर मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ते यानिमित्ताने करणार आहेत.
रविकांत तुपकर यांचा १३ मे रोजी जन्मदिवस आहे. तुपकरांचा वाढदिवस दरवर्षी अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतो. आपल्या क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरच्या कार्यालयात तुपकर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असतात. सगळ्यांना भेटत असतात. यंदा मात्र तुपकर आंदोलनात्मक पद्धत्तीने जन्मदिवस साजरा करणार आहेत. ते चाहत्यांना भेटतील, पण कोणतेही बॅनर लावू नका, पुष्पगुच्छ आणू नका असे आवाहन रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
advertisement

कर्जमुक्तीचे आश्वासन पाळा, सोयाबीन-कापसाला भावफरक द्या

शेतकरी संकटात आहेत. दिवसाला १० शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या आधी दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन शासनाने पाळावे. अजूनही ज्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात त्वरित पिक विम्याची रक्कम जमा करावी. सोयाबीन-कापसाला भावफरक द्या, बँकानी शेतकऱ्यांच्या रकमेला लावलेले होल्ड काढावेत, अशा मागण्यांसंबंधी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी एकदिवसीय उपवास रविकांत तुपकर करणार आहेत.
advertisement

कोण आहेत रविकांत तुपकर ?

गेली अनेक वर्षे रविकांत तुपकर शेतकऱ्यांसाठी लढत आहेत
शेतमालाला भाव, पीकविमा यासाठी त्यांनी शेकडो आंदोलने केली आहेत
विदर्भातल्या बुलढाण्यात त्यांनी शेतकऱ्यांचे मोठे नेटवर्क उभारले आहे
शेतकऱ्यांचे आक्रमक नेतृत्व म्हणूनही त्यांची ओळख आहे
गत लोकसभा लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला
परंतु निवडणुकीतल्या पराभवानंतरही ते शांत बसले नाहीत
advertisement
आता वाढदिवशी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सरकारला घेरणार, वाढदिवशी कुटुंबासह घरासमोरच्या अंगणातच उपोषण करणार, शेतकरी नेत्याचा निर्णय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement