जास्त भाडं घेतलं, महिला प्रवाशांनी रिक्षाचालकाला बेकार मारलं, VIDEO व्हायरल

Last Updated:

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि महिलांनी रिक्षाचालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

News18
News18
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
बेळगाव:  महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बेळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  डॉ. आंबेडकर रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयासमोर भाड्याच्या क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालक आणि दोन महिला प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि महिलांनी रिक्षाचालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी गांधी नगरला जाण्यासाठी आलेल्या दोन महिला प्रवाशांनी रिक्षाचालक मोहम्मद अन्वर मकानदार यांच्याशी भाड्यावरून वाद झाला होता. रिक्षाचालकाने १५० रुपये भाडे सांगितले असता, महिलांनी नेहमीप्रमाणे ७०-८० रुपये देण्याची तयारी दर्शवली. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
advertisement
या वादानंतर संतप्त झालेल्या महिलांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करत मारहाण केली, असा आरोप रिक्षाचालक मोहम्मद अन्वर मकानदार याने केला आहे. महिला प्रवाशांनी केलेल्या हल्ल्यात रिक्षाचालक अन्वर जखमी झाला असून, रिक्षाची काचही फोडण्यात आली आहे. जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी बेळगावातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
दुसरीकडे, प्रवाशांपैकी एक असलेल्या अल्मास यांनी रिक्षाचालकावर आरोप केला आहे. रिक्षाचालकाने भाड्यावरून वाद घातल्यानंतर आपल्याला मारहाण केली आणि रिक्षाचे भाडे जास्त मागितलं. प्रवाशांसोबत गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून घेतले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जास्त भाडं घेतलं, महिला प्रवाशांनी रिक्षाचालकाला बेकार मारलं, VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement