Jalgaon: पालिकेतील कंत्राटासाठी पोलीस स्टेशनमध्ये घुसून मारामारी, शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा
- Published by:Sachin S
Last Updated:
जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव: राज्यात एकीकडे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्ताधारी गटात आहे. पण, सत्तेत असतानाही रस्त्यावर मात्र दोन्ही गटात कुठे ना कुठे वाद होत असल्याचं समोर आलं आहे. अशातच आता जळगाव महापालिकेमध्ये कंत्राटदाराच्या वादातून भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पोलीस स्टेशनमध्येच जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही गटामध्ये तुफान मारामारी झाली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टच्या वादातून दोन्ही गटांमध्ये शनिवारी दुपारी हाणामारी झाली होती. त्यानंतर आता पुन्हा राडा झाला.
भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे यांच्यासह माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि शिवसेना शिंदे गटाचे राहुल ठाकरे हे परस्परविरोधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत असताना जोरदार हाणामारी झाली. शहरातील बालाजी पेठ परिसरामध्ये दुपारी दोन गट समोरासमोर आल्यानंतर हाणामारी झाली होती. त्यानंतर दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यानंतर पोलीस स्थानकातच हाणामारी झाली होती.
advertisement
पण, वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हाणामारी थांबली होती. या घटनेमध्ये माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि नगरसेवक कल्पेश सोनवणे हे जखमी झाले आहे. थेट पोलीस स्थानकातच हाणामारी झाल्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमावला पांगवलं. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी दोन्ही गटाने एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 6:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: पालिकेतील कंत्राटासाठी पोलीस स्टेशनमध्ये घुसून मारामारी, शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा









