Halwyache Dagine: मकर संक्रांतीला खरेदी करा स्वस्तात हलव्याचे दागिने, पुण्यातलं 'हे' ठिकाण आहे फेमस
- Reported by:Prachi Balu Kedari
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. अवघ्या काही दिवसांवर संक्रांत येऊन ठेपली असून बाजारपेठेत सणाची लगबग चांगलीच वाढली आहे.
पुणे: मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. अवघ्या काही दिवसांवर संक्रांत येऊन ठेपली असून बाजारपेठेत सणाची लगबग चांगलीच वाढली आहे. मकर संक्रांत म्हटलं की काळी साडी, तिळगूळ आणि विशेषतः हलव्याचे दागिने हे या सणाचे मुख्य आकर्षण असते. लग्नानंतर पहिली संक्रांत असलेल्या मुलींसाठी किंवा सुनेसाठी हमखास हलव्याचे दागिने खरेदी केले जातात. त्यामुळे पुण्यातील बाजारपेठांमध्ये हलव्याचे दागिने खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.
पुण्यातील शुक्रवार पेठ हे हलव्याचे दागिने खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला कमी किंमतीत आणि विविध प्रकारचे हलव्याचे दागिने उपलब्ध असल्याने ग्राहकांची विशेष पसंती या बाजाराला मिळत आहे. शुक्रवार पेठेतील आईजी सेल्स हे दुकान गेली दहा वर्षे ग्राहकांच्या सेवेत असून येथे चार ते पाच प्रकारचे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्या महिलांपर्यंत सर्वांसाठी योग्य असे दागिने येथे पाहायला मिळतात. या दुकानात मंगळसूत्र, कानातले, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या, बिंदी, हार असे विविध प्रकारचे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत.
advertisement
हे हलव्याचे दागिने पारंपरिक पद्धतीने ओवलेले असून सणासाठी खास तयार करण्यात येतात. याशिवाय दागिन्यांसोबत वाण देण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही येथे उपलब्ध आहेत. सजावटीसाठी हँगिंग डेकोरेशन, घरातील सजावटीचे साहित्य आणि विविध डेकोरेशन आयटम्सही ग्राहकांना येथे मिळतात. विशेष म्हणजे, या हलव्याच्या दागिन्यांचे सेट या दुकानामध्ये केवळ 100 रुपयांपासूनच उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही परवडणाऱ्या दरात सणाची तयारी तुम्हाला करता येणार आहे. वेगवेगळ्या डिझाइन आणि व्हरायटीमुळे महिलांना आपल्या पसंतीनुसार दागिने निवडता येत आहेत.
advertisement
मकरसंक्रांत सण जवळ आल्याने शुक्रवार पेठेतील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. स्वस्त दरात आणि चांगल्या दर्जाचे हलव्याचे दागिने उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे,अशी माहिती व्यावसायिका ममता चौधरी यांनी दिली. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शुक्रवार पेठ सध्या संक्रांतीच्या रंगात रंगून गेली असून, हलव्याच्या दागिन्यांनी बाजारपेठ अधिकच खुलून दिसत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 6:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Halwyache Dagine: मकर संक्रांतीला खरेदी करा स्वस्तात हलव्याचे दागिने, पुण्यातलं 'हे' ठिकाण आहे फेमस










