काय सांगता! आता आयटीआयमध्ये मिळणार मंत्रोच्चाराचे धडे, शैक्षणिक पात्रता काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
महाराष्ट्र सरकार तर्फे 'अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम' हा उपक्रम सध्या महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातूनच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पहिल्यांदाच वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट या नवा प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. येत्या वर्षी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असून या वेळी वैदिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध व्हावेत म्हणून तेथील आयटीआयमध्ये अभ्यासक्रम सुरू केला जात आहे.

राज्यभरात कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता वाढवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सौरऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, कृत्रिम प्रज्ञा, ग्रीन हायड्रोजन, मोबाइल दुरुस्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व इतरही शेकडो नवे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. आयटीआय आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये चालवण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांतून सुमारे ७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुढील वर्षापासून ही संख्या एक लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढविन्याय येणार आहे.
advertisement
युवा पिढीला त्वरित रोजगार मिळवता यावा, या उद्देशाने विविध अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योगसंगत ज्ञान दिले जाते, जे त्यांना स्वावलंबी आणि कौशल्यपूर्ण बनविण्यात मदत करतात. यातून विद्यार्थ्यांचे अर्थार्जन होण्यास मदत होईल. आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रशिक्षणासोबत वैदिक मंत्रांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश तांत्रिक कौशल्यासोबत आध्यात्मिक ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. हा अभ्यासक्रम पहिल्यांदाच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये राबविला जाणार आहे.
advertisement
पहिल्यांदाच आयटीआय मध्ये वैदिक संस्कार, मंत्रोच्चाराचे मिळणार धडे
नाशिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पहिल्यांदाच वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. पुढील वर्षी नाशिकमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये वैदिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध व्हावेत म्हणून तेथील आयटीआयमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यास चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या २०२६ च्या कुंभमेळ्यासाठी प्रशिक्षित पुजारी तयार करण्यासाठी विशेष अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार आणि मंत्रोच्चाराचे प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे कुंभमेळ्यात योग्य प्रशिक्षण घेतलेले पुजारी उपलब्ध होतील अशी आशा आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेत अर्जाची छाननी आणि मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
October 14, 2025 8:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काय सांगता! आता आयटीआयमध्ये मिळणार मंत्रोच्चाराचे धडे, शैक्षणिक पात्रता काय?