पूर्व विदर्भात भाजपला आणखी एक धक्का, माजी आमदार करणार काँग्रेसमध्ये घरवापसी

Last Updated:

माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी करणार असल्याचे संकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते.

News18
News18
रवि सपाटे, प्रतिनिधी
गोंदिया : भाजपला काँग्रेसने पूर्व विदर्भात मोठा धक्का दिला. गोंदिया विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 2019 मध्ये त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण आता त्यांनी पुन्हा घरवापसी करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसकडून 3 वेळा विधानसभा व 2 वेळा विधानपरिषद सदस्य होते. येत्या 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
advertisement
माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी करणार असल्याचे संकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते. अखेर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, आता दिल्लीवरून त्यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे.
advertisement
गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून 2 वेळा विधानपरिषद तर 3 वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. मात्र 2019 निवडणुकीदरम्यान त्यांनी मोदी लाटेत भाजप प्रवेश केला होता. त्यांना भाजपने उमेदवारी ही दिली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपात अस्वस्थ होते. अखेर त्यांनी आज भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती दिली आहे.
advertisement
विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एक माजी आमदार आणि भाजपला सोडचिट्टी दिल्याने पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का समजला जात आहे. गोपाल अग्रवाल यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड, काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे मात्र निश्चित झाले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पूर्व विदर्भात भाजपला आणखी एक धक्का, माजी आमदार करणार काँग्रेसमध्ये घरवापसी
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement