४८ लाख रुपयांचं बक्षीस असलेले सहा माओवादी ठार, चार महिला माओवाद्यांचा समावेश, ओळख पटली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या जंगलात काल झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले होते.
महेश तिवारी, गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या हद्दीत काल चकमकीत ठार झालेल्या सहा माओवाद्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर ४८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. चार महिला माओवाद्यांचाही यात समावेश होता.
गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या जंगलात काल झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले होते. या सहा माओवाद्यांची ओळख पटली असून त्यात माओवाद्यांच्या पीपल्स गुरिल्ला आर्मी या क्रमांक एक प्लाटूनच्या चार महिला माओवाद्यांचा समावेश आहे. मोठ्या माओवादी नेत्यांना सुरक्षित नेण्यासाठी या प्लटूनचा माओवादी वापर करतात.
मृतक माओवाद्यांमध्ये प्लॅटून क्रमांक एकची डीव्हीसीएम कमांडर राहुल पूनम, पीएलजीएची सदस्य पुंगी ताटी, तिसरी मृतक पीएलजेची सदस्य मनीषा यासह, ताटी मीना, हरीश उर्फ कोसा आणि कुडाम बुधरी या माओवाद्यांचा समावेश असून प्रत्येकावर आठ लाख रुपये प्रमाणे ४८ लाख रुपयाचे बक्षीस होते. घटनास्थळी एके 47, एस एल आर, बी जे लॉन्चर यासह स्फोटक सामग्री सुरक्षा दलाने जप्त केली आहे.
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
July 19, 2025 8:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
४८ लाख रुपयांचं बक्षीस असलेले सहा माओवादी ठार, चार महिला माओवाद्यांचा समावेश, ओळख पटली