advertisement

लेकीचा निर्णय-पवारांना साथ देऊन बापाला पराभवाची धूळ चारायची, भाग्यश्री आत्राम यांनी 'तुतारी' फुंकली

Last Updated:

Bhagyashree Atram: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भाग्यश्री आत्राम यांनी तुतारी फुंकली.

भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवार गटात प्रवेश
भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवार गटात प्रवेश
गडचिरोली : अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या लेकीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. निष्ठा पायदळी तुडविवेल्या वडिलांना येत्या विधानसभेला पराभवाची धूळ चारेन, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. भाग्यश्री यांच्या पवार गटातील प्रवेशाने महाराष्ट्राला बाप-लेकीमधला संघर्ष विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' गडचिरोलीत आहे. याच यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भाग्यश्री आत्राम यांनी 'तुतारी' फुंकली.
माझ्या लेकीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर मी तिला आणि तिच्या सासरच्या मंडळींना नदीत फेकून देईन, अशी आक्रमक भूमिका मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतली होती. मात्र भाग्यश्री यांनी वडिलांच्या भूमिकेविरोधात जाऊन तुतारी फुंकली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत बापलेक आमनेसामने असणार आहेत.
advertisement
कोण आहे भाग्यश्री आत्राम?
भाग्यश्री आत्राम या धर्मरावबाबा आत्राम यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. पुण्यातील भारती विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. २०१३ मध्ये त्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. बेळगावच्या ऋतुराज हलगेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर २०१९ पासून काही कारणांनी बापलेकीत राजकीय शत्रुत्व निर्माण झाले. विधानसभेच्या तोंडावर त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. हे पक्षांतर होऊ नये म्हणून धर्मरावबाबा आत्राम तसेच अजित पवार यांनीही प्रयत्न केला परंतु भाग्यश्री यांनी बापाविरोधात बंड करून विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला.
advertisement
कोण आहेत धर्मरावबाबा आत्राम?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम हे विदर्भातील प्रमुख चेहरा होते. अनिल देशमुख यांच्यानंतर आत्राम यांच्याकडे विदर्भाचा चेहरा म्हणून पाहिले जायचे. मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर आत्राम यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. दादांनीही आत्राम यांना ज्येष्ठ नेत्यांबरोबर झटक्यात मंत्री केले. अहेरी विधानसभा मतदारसंघातून आत्राम तीन टर्म आमदार आहेत. विधानसभा निवडणूक १९९९, २००४ आणि २०१९ मध्ये त्यांनी अहेरीचे प्रतिनिधित्व केले. सध्या ते महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
लेकीचा निर्णय-पवारांना साथ देऊन बापाला पराभवाची धूळ चारायची, भाग्यश्री आत्राम यांनी 'तुतारी' फुंकली
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement