advertisement

एकविरा आईचं मंदिर कुर्ल्यात, गणेशभक्तानं साकारला हुबेहुब देखावा, Video

Last Updated:

लोणावळा येथील कार्लातील आई एकवीरा मंदिरातील गाभाऱ्याची प्रतिकृती त्यांनी साकारली आहे.

+
News18

News18

मुंबई, 21 सप्टेंबर : गणेशोत्सवात बाप्पाचं घरोघरी आगमन होतं. बाप्पाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे करण्यात येतात. मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या साईराज सुभाष म्हात्रे या तरुणाने आपल्या घरी लोणावळा येथील कार्लातील आई एकवीरा मंदिरातील गाभाऱ्याची प्रतिकृती असलेली आरास साकारली आहे.
या देखाव्याला साजेशा बाप्पाची मूर्ती त्यानं स्थापन केलीय. त्याचा हा देखावा आणि कोळी पेहरावातील गणेश मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मखर करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची मी विशेष काळजी घेतलीय. त्यामुळेच संपूर्ण मखर ही कागदी वस्तूंचा वापर करत तयार केलीय.
advertisement
मखर तयार करण्यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागला तर गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सवात विविध विषयांवर देखावे सादर केले आहेत. वनराई, गड किल्ले, धबधबा, महालक्ष्मी, वॉटर पार्क, आणि यंदा एकविरा आई मंदिर, साकारलं असून गणेश मूर्ती देखील त्याला साजेशी अशीच बसविण्यात आली आहे, अशी माहिती साईराजनं दिली.
advertisement
समाजाबद्दल, पर्यावरणाबद्दल असलेलं भान सर्वांनी जपणं गरजेचं आहे. साईराजनं ते जपलंय. त्यामुळे त्याचा देखावा कुर्ला परिसरात कौतुकाचा विषय बनला असून देखावा पाहण्यासाठी गर्दी होतीय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकविरा आईचं मंदिर कुर्ल्यात, गणेशभक्तानं साकारला हुबेहुब देखावा, Video
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement