Gauri puja: तब्बल 70 वर्षांची परंपरा, तोतला कुटुंबियांच्या नवसाला पावणाऱ्या महालक्ष्मींची चर्चा, VIDEO
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Gauri puja: तोतला कुटुंबाच्या घरी 70 वर्षांपेक्षा जास्त काळापासून महालक्ष्मी बसवल्या जातात.
छत्रपती संभाजीनगर : घरोघरी लाडक्या गौराईचं आगमन झालं आहे. रविवारी (31 ऑगस्ट) भाविकांनी अतिशय उत्साहात आणि आनंदाने गौरीचं स्वागत केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अनेक ठिकाणी गौरी आगमन झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गौरीला 'महालक्ष्मी' नावाने ओळखलं जातं. महालक्ष्मी आगमनानिमित्त शहरातील 'तोतला' कुटुंब चर्चेत आलं आहे. असं म्हणतात या कुटुंबाकडे असलेल्या महालक्ष्मी नवसाला पावणाऱ्या आहेत. दूरवरून भाविक या महालक्ष्मींचं दर्शन घेण्यासाठी येतात.
तोतला कुटुंबीय पिढीजात छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. त्यांच्या घरी 70 वर्षांपेक्षा जास्त काळापासून महालक्ष्मी बसवल्या जातात. त्यांच्या घरच्या महालक्ष्मी नवसाला पावतात, अशी मान्यता आहे. याच कुटुंबातील एका स्त्रीने देवीकडे मुलाच्या नवस केला होता. मुलाचं लग्न झालं तर देवीची घरीच सेवा करेन, असा नवर स्त्रीने मागितला होता. इच्छापूर्ती झाल्यानंतर तोतला कुटुंबातील स्त्रीने घरी महालक्ष्मी बसवायला सुरूवात केली. तेव्हापासून तोतला कुटुंबातील प्रत्येक पिढी दरवर्षी महालक्ष्मी बसवते आणि तिची सेवा करते.
advertisement
Gauri Ganpati: अवतरली, नवसाची गौराई माझी...! भांडूपच्या या कुटुंबातील गौरीची होतेय चर्चा, पाहा PHOTO
नवसाला पावणाऱ्या महालक्ष्मी, अशी ख्याती असल्यामुळे अनेक भाविक तोतला यांच्या घरी येतात. देवीचं दर्शन घेऊन आपली इच्छा देवीला सांगतात. विशेष म्हणजे इच्छापूर्ती झाल्यानंतर भाविक पुन्हा येऊन महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होतात आणि नवस पूर्ण करतात. तोतला कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भाविका बाळाची इच्छा घेऊन येतात. देवीच्या आशीर्वादानं आजारपणही दूर होतं. अगदी मुंबई, पुणे आणि बंगळूरवरून सुद्धा भाविक याठिकाणी दर्शनाला येतात.
advertisement
तोतला कुटुंबियांनी टोकन पद्धतीने दर्शनाची व्यवस्था केली आहे. भाविकांची संख्या जास्त असते. दूरवरून आलेल्या भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं, यासाठी हे नियोजन करण्यात आलं आहे. टोकन पद्धतीमुळे सर्व भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येतं आणि आपला नवसही फेडता येतो.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Sep 01, 2025 1:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gauri puja: तब्बल 70 वर्षांची परंपरा, तोतला कुटुंबियांच्या नवसाला पावणाऱ्या महालक्ष्मींची चर्चा, VIDEO




