हादरवून टाकणारी घटना, गोल्ड लोन प्रकरणात फसवणूक, फिर्यादीच्या कृत्याने पोलिसांना फुटला घाम, घडलं काय?

Last Updated:

भंडारा जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका बॅक मॅनेजरने अमित जोशी नावाच्या व्यक्तीची फसवणूक केली होती.या फसवणूकी प्रकरणी त्याने पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केला आहे.

 bhandara news
bhandara news
Bhandara News : रवी सपाटे, भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका बॅक मॅनेजरने अमित जोशी नावाच्या व्यक्तीची फसवणूक केली होती.या फसवणूकी प्रकरणी त्याने पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केला आहे. या तक्रारीनंतर काही दिवसांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात येऊन फिर्यादीने जे केलं ते खूपच भयानक होतं.या घटनेने भंडारा हादरलं आहे.त्यामुळे नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
भंडारा येथील मणप्पुरम गोल्ड लोन बँकेच्या मॅनेजरनं फसवणूक केल्याचा आरोप करीत अमित जोशी यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातचं विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळं भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेनं पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलिसांनी त्याला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांकरिता दाखल केलं. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून प्रकृती स्थिर आहे. परंतु त्यांना नागपूर येथे ही हलविण्याची शक्यता असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
advertisement

प्रकरण काय?

अमित जोशी यांचा मुलगा हिमांशू यांनं महिनाभरापूर्वी मणप्पुरम गोल्ड लोन बँकेत 292 ग्रॅम सोनं गहाण ठेवून त्यावर सुमारे 18 लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र, ज्या कामासाठी त्यांना पैशाची गरज होती, ते काम समोर ढकलल्यानं मणप्पुरम बँकेचा मॅनेजर रोहित साहू यानं जोशी यांच्याकडून ती रक्कम परस्पर फसवणूक करीत स्वतःच्या खात्यावर वळविले आणि भंडारा येथून मॅनेजर साहू हे गायब झालेत. साहू यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तर दिल्यानं अमित जोशी यांना शंका आली.
advertisement
याप्रकरणी अमित जोशी यांनी 19 ऑगस्टला भंडारा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मॅनेजर साहू याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान 316 (2), 318 (4) कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भंडारा पोलीस तपास करीत असतानाचं अमित जोशी यांना विषप्राशन करण्याचं नाटक करण्याची चिथावणी कोणी तरी दिली. विषप्राशन केल्यास पैसे तातडीनं मिळतील यातून अमित जोशी यांनी आज टोकाची भूमिका घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
या घटनेनंतर पोलिसांनी त्याला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांकरिता दाखल केलं. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून प्रकृती स्थिर आहे. परंतु त्यांना नागपूर येथे ही हलविण्याची शक्यता असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हादरवून टाकणारी घटना, गोल्ड लोन प्रकरणात फसवणूक, फिर्यादीच्या कृत्याने पोलिसांना फुटला घाम, घडलं काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement