भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघे जागेवर गेले, 7 जण जखमी, गाडीचा चक्काचूर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मृतक प्रवासी कारने नागपूरकडून रायपूरकडे गावी जात असताना अपघात घडला.
रवी सपाटे, प्रतिनिधी, गोंदिया: राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडकून कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये. सडक अर्जुनी तालुक्यातील नैनपुर/डुग्गीपार परिसरात ही घटना घडली.
देवेंद्र कतलाम (25), द्रोणा नरेश साहू दोघेही राहणार पाटण, बरबसपूर जि. दुर्ग (छत्तीसगड.) अशी मृतांची नावे आहे. सर्व जखमींना गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून मृतदेह उत्तरीय तपासणी पाठविण्यात आले आहे.
दोघेही मृतक आणि जखमी प्रवासी हे कारने नागपूरकडून रायपूरकडे गावी जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर डुग्गीपार (नैनपूर) येथील पेट्रोल पंप परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की, कारमध्ये चालकासोबत समोर बसलेले देवेंद्र आणि द्रोणा दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
advertisement
यावेळी कारमध्ये 11 प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती असून त्यापैकी 7 जण गंभीर जखमी झाल्याचे तर दोघे किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जखमींमध्ये एका 2 वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून जखमींना गोंदियाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
November 27, 2025 7:42 PM IST


