Gondia Crime : 12 वर्षीय मुलीचं अपहरण करत अत्याचार करुन हत्या; आरोपींना पाहून पोलिसही शॉक
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Gondia Crime : लग्न सोहळ्यातून अपहरण करुन अत्याचार करत अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना गोंदियात घडली होती. या घटनेतील आरोपींना अखेर ताब्यात घेण्यात आले आहे.
गोंदिया, (रवी सापते, प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलांनी केलेल्या हत्याकांडाने गोंदिया जिल्हा हादरला आहे. देवरी तालुक्यातील एका लग्न सोहळ्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. 19 मेच्या रात्री ही घटना घडली होती. 20 मे रोजी सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. या घटनेनंतर आरोपींच्या शोधासाठी 40 पोलिसांचे 8 वेगवेगळे पथक तपास करत होती. अखेर या प्रकरणातील चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
या सर्व आरोपींना बाल न्याय मंडळ येथे हजर केल्यानंतर त्यांना 17 मे पर्यंत बाल सुधार गृह (नागपूर) येथे पाठविण्यात आले आहे. प्रकरणाचा उलगडा करायला पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. कारण येथे सीसीटिव्हीची सोय नाही, कोणताही धागादोरा नाही, पोलीस तपासात उपयोग करतात अशी कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. पण पोलीस पथकांनी शास्त्रीय पद्धतीने विचारपूस केली. मोबाईल सिडीआर आणि व्हॉट्सॲपवर चट वरुन पूर्वी संशयित आणि नंतर या प्रकरणात गुंतलेल्या अल्पवयीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलीस ताब्यात असलेल्या बालकांचा वय १) 17 वर्ष 2 महिने २)17 वर्ष 4 महिने ३)17 वर्ष 6 महिने ४)17 वर्ष 10 महिने असे आहे.
advertisement
वाचा - 1 मुलगी आणि 2 मुलं... त्रिकोणी प्रेमकथेचा भयानक शेवट; घटना पाहून पोलीसही शॉक
गेल्या सात दिवसापासून जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना देवरी तालुक्यातील गोठानपार येथे 19 मे रोजी घडली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती. पोलीस प्रशासनावरही या निमित्ताने मोठा ताण निर्माण झाला होता. अखेर सातव्या दिवशी पोलिसांना तपासात यश आलं असून चार अल्पवयीन शाळकरी मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक नित्यानंद झा यांनी दिली. गोठानपार येथे 19 मे रोजी लग्नकार्यात सहभागी झालेल्या सहाव्या वर्गातील 12 वर्षांच्या मुलीवर अज्ञात इसमांनी जंगलात नेऊन विवस्त्र करत अत्याचार केला होता. आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केलाची घटना 20 रोजी उघडकीस आली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांना 5 ते 6 दिवस लोटूनही तपासाला यश मिळत नसल्याने नागरिकांकडूनही प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात होते. पण शनिवार 27 एप्रिल रोजी या प्रकरणातील सर्व बाबींचा उलगडा करीत पोलिसांनी पत्र परिषद घेऊन सांगितले.
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
April 27, 2024 7:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia Crime : 12 वर्षीय मुलीचं अपहरण करत अत्याचार करुन हत्या; आरोपींना पाहून पोलिसही शॉक


